मलकापूर : शासन निर्णयानुसार शाहूवाडी तालुक्यातील १ हजार ४९४ पूरग्रस्त कुंटुबांना ७२ लाख ९५ हजार रुपये देण्यात आले आहे . पूरग्रस्त कुटुंबांना पूर्णपणे अनुदान वाटण्यासाठी १ कोटी ४९ लाख ४० हजार रुपयाची आवश्यकता आहे .
१८ हजार ६४६ पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत . त्यासाठी ८ कोटी १० लाख रुपयाच्या निधीची गरज असून तसा प्रस्ताव शासन दरबारी कृर्षी विभागाने पाठविला आहे. महापुराच्या काळात ३५ जनावरे मृत झाली आहेत ८२ हजार ९ ५० रुपये अनुदानाची गरज आहे. तालुक्यात ७९ घरांची पडझड झाली आहे. त्यासाठी १ कोटी १८ लाख रुपयाची अनुदानाची गरज आहे. ५९ जनावरांच्या गोठ्याची पडझड झाली आहे. लाभार्थीना १ लाख २३ हजार ९०० रुपये अनुदानाची गरज आहे. वारणा , कडवी, शाळी व कासारी नद्यांना आलेल्या पुराच्या पाण्यात ४५३ नागरिकांची दुकानाचे नुकसान झाले होते. त्यासाठी २ कोटी २६ लाख ५० हजार रुपयाची अनुदानाची गरज आहे. ३४ टपरी दुकानाचे नुकसान झाले आहे. त्यासाठी ३ लाख ४० हजार अनुदानाची मागणी शासनाकडे केली आहे.