कृष्णा सावंत ।आजरा : लाभक्षेत्रात आवश्यक असणाºया जमिनीचे संपादन अपूर्ण असल्याने व पारपोली गावठाण या दोन गावांतील जमीन, घरांचे संपादन पूर्ण करणे आवश्यक असल्याने आजºयाच्या पश्चिम भागासह गडहिंग्लज तालुक्यातील शेतकºयांना वरदान ठरणारा सर्फनाला प्रकल्प केवळ जमीन संपादनाअभावी रखडला आहे. जून २००० मध्ये या प्रकल्पाला प्राथमिक मंजुरी मिळाली. मात्र, २००८ मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली असली तरी २२० हेक्टर क्षेत्र प्रकल्पग्रस्तांना अद्याप देय आहे.
या प्रकल्पातील पाणी हिरण्यकेशी नदीत सोडण्यात येणार आहे. त्यामुळे हिरण्यकेशी काठावरील आजरा व गडहिंग्लज तालुक्यांतील गावांना या प्रकल्पाचा लाभ होणार आहे. शिवाजी विद्यापीठातर्फे अभ्यास झालेल्या प्रकल्पाच्या सामाजिक परिणामांचा अहवाल अद्याप जाहीर झाला नसल्यामुळे संपादनाची प्रक्रिया रखडली आहे.
आंबाडे येथील तिसºया गावठाणाचा प्रश्न प्रलंबित आहे. पारपोली आणि गावठाण ही दोन गावे प्रामुख्याने पूर्ण विस्थापित झाल्याने संपादनाची प्रक्रिया पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. शेळप, देवर्डे येथे दोन गावठाणे तयार करण्यात आली आहेत. तिसºया ठिकाणी होणाºया नवीन आंबाडे, गावठाणचा प्रश्न प्रलंबित आहे. शेळप, वेळवट्टी, दर्डेवाडी, मेढेवाडी, माद्याळ, विनायकवाडी या गावांतील जमीन संपादित होऊन पसंती करून ताब्यात घेतल्या आहेत. अन्य धरणांच्या तुलनेत पुनर्वसनाची स्थिती बरी असली तरी जमिनी संपादनाची प्रक्रिया थंडावली आहे. देवर्डे आणि पेरणोली येथील खासगी जमिनीची संपादनाची प्रक्रिया प्रलंबित आहे. पारपोली व देवर्डे गायरान जमिनी पुनर्वसनासाठी वर्ग करण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रालय स्तरावर प्रलंबित आहे.७० हेक्टर जमीन नापीकवेळवट्टी, दर्डेवाडी, मेढेवाडी, माद्याळ, विनायकवाडी या गावांतील जमीन संपादित होऊन पसंती करून ताब्यात घेतली असली तरी यामधील ७० टक्के जमीन नापीक असल्याचा प्रकल्पग्रस्तांचा आरोप आहे.प्रकल्पातील अडचणी१०९ खातेदारांना १२६.३१ हेक्टर जमिनींचे वाटप होणे बाकी आहे.मुलकी पड जमीन वर्ग करणे आवश्यक.देवर्डे, कोरीवडे व पेरणोली येथील भू-संपादनाची कार्यवाही होणे आवश्यकस्वेच्छा पुनर्वसन घेतलेल्या १२ खातेदारांना नुकसानभरपाई देणे गरजेचे आहे.बुडीत क्षेत्रातील पारपोली व गावठाणवाडी गावठाण प्रस्तावानुसार पुनर्वसन होणे आवश्यक आहे.