कोल्हापूर : मी समृद्ध तर गाव समृद्ध या विचाराने मनरेगा योजना गावपातळीवर राबविण्यात लोकसहभाग वाढवावा, अशा सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी केल्या.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजना अर्थात मनरेगा या योजनेसंदर्भात मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सभा झाली. जिल्हाधिकारी दौलत देसाई, उपायुक्त नयना बोंदार्डे, रोहयोच्या उपजिल्हाधिकारी स्मिता कुलकर्णी, कृषी विभागाच्या उपसंचालक भाग्यश्री पवार हे सहभागी झाले.
रोहयोचे प्रधान सचिव नंदकुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, राज्य महिला सरपंच परिषदेच्या अध्यक्षा राणी पाटील यांच्यासह जिल्ह्यातील प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, सरपंच व ग्रामसेवक सहभागी झाले.स्वच्छता अभियानासारखे मनरेगातही काम करासरपंचांना मार्गदर्शन करताना आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार म्हणाले, ग्रामपंचायती या विकासाची मंदिरे आहेत. सरपंच, ग्रामसेवक हे त्याचे पुजारी आहेत. मनरेगासारख्या योजनेत गावांचा कायापालट करण्याची ताकद आहे. कोल्हापूर हा तर राजर्षी शाहू महाराजांचा जिल्हा आहे. त्यांच्या विचाराने जिल्हा कायमच नवनवीन संकल्पनांसह अग्रेसर राहिला आहे. ग्रामस्वच्छता अभियानात त्याने हे दाखवून दिले आहे. आता मनरेगामध्येही त्याच उंचीचे काम करायचे आहे.जमीन सुधारणा कार्यक्रम घ्यावनसंवर्धन, मृदा संवर्धन, जलसंवर्धन आणि पशुसंवर्धन कामावर भर द्या, असे सांगताना पोपटराव पवार यांनी कोल्हापूर पाण्याच्या बाबतीत समृद्ध पण अमर्याद वापराने जमिनी खराब होऊ लागल्या आहेत. मनरेगातून जमिनीचा आरोग्य सुधारणा कार्यक्रम घ्यावा, असे सुचविले.