लोकमत न्यूज नेटवर्क
म्हालसवडे : कसबा आरळे ( ता . करवीर ) येथील ग्रामपंचायतीमार्फत कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी ग्रामस्थांचे प्रबोधन सुरू करण्यात आले आहे . लसीकरणासाठी ग्रामस्थांनी अत्यल्प प्रतिसाद दिल्यामुळे सरपंच आपल्या दारी, हा उपक्रम येथे चालू केला असून, कोरोनाच्या साथीला आळा घालण्याकरिता सरपंच ईश्वरा कांबळे व ग्रामपंचायतीचे कर्मचारी घरोघरी जाऊन प्रबोधन करीत आहेत.
कसबा आरळे येथे दोन महिला कोरोना बाधित झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासन खडबडून जागे झाले असून, शासनाच्या ‘ब्रेक द चेंन’ या उपक्रमाची गावात कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. आरोग्य विभागाच्या सूचनेनंतर सरपंच ईश्वरा कांबळे , ग्रामसेवक सम्राट रानगे, एकनाथ जाधव, अभिजित पाटील, शिवाजी पाटील हे घरोघरी जाऊन नागरिकांना आरोग्य केंद्रांमधून कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी प्रबोधन करीत आहेत . नागरिकांमधूनही या उपक्रमाला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे .
फोटो : कसबा आरळे (ता. करवीर ) येथे लसीकरणासाठी प्रबोधन करताना सरपंच ईश्वरा कांबळे व ग्रामपंचायतीचे कर्मचारी .