प्रवीण देसाई
कोल्हापूर ,दि. २५ : सरपंचपदासाठी उमेदवारी अर्जच न दाखल झाल्याने जिल्ह्यातील सात ग्रामपंचायतींचे सरपंचपद रिक्त राहिले आहे. त्यामुळे या ठिकाणी फेरनिवडणूक होणार आहेत. यासंदर्भातील अहवाल जिल्हा निवडणूक विभागाने राज्य निवडणूक आयोगाला पाठविला आहे.
जिल्ह्यातील ४३५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका १६ आॅक्टोबरला झाल्या. यंदा प्रथमच जनतेतून थेट सरपंच निवडण्याची प्रक्रिया झाली. त्यामुळे सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांसाठी स्वतंत्रपणे मतदान झाले. जिल्ह्यातील सात ग्रामपंचायतींमध्ये आरक्षित प्रवर्गातील सरपंचपदासाठी उमेदवारी अर्जच आले नाहीत. त्यामुळे या ग्रामपंचायतींच्या निवडणुका या सरपंचपदाविनाच झाल्या.
भुदरगड तालुक्यातील अनफ खुर्द, गगनबावडा तालुक्यातील मार्गेवाडी, चंदगड तालुक्यातील चंदगड, हल्लारवाडी, करंजगाव, राधानगरी तालुक्यातील ढेंगेवाडी, केळोशी खुर्द या ग्रामपंचायतींचा त्यामध्ये समावेश आहे. या रिक्त पदांसंदर्भातील अहवाल जिल्हा निवडणूक विभागाने राज्य निवडणूक आयोगाकडे नुकताच पाठविला आहे.
सरपंचपद रिक्त असल्याने या ठिकाणी फेर निवडणुका होणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाकडून याबाबत मार्गदर्शन आल्यानंतर पुढील कार्यवाही होणार आहे. तोपर्यंत या ग्रामपंचायतींचा पदभार हा उपसरपंचांच्याकडेच राहणार आहे, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.थेट सरपंच निवड झाल्याने आता फक्त उपसरपंचपदाच्या निवडी होणार आहेत. त्यादृष्टीने जिल्ह्यातील ग्रामपंचायत पातळीवर हालचाली सुरू आहेत.
सरपंचपद रिक्त असलेल्या ग्रामपंचायततालुका गाव आरक्षण
- भुदरगड अनफ खुर्द नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
- गगनबावडा मार्गेवाडी नागरिकांचा मागास प्रवर्ग
- चंदगड चंदगड अनुसूचित जाती
- चंदगड हल्लारवाडी नागरिकांचा मागास प्रवर्ग
- चंदगड करंजगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग
- राधानगरी ढेंगेवाडी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
- राधानगरी केळोशी खुर्द