कोल्हापूर : संदेसे आते है, वंदे मातरम्, मॉँ तुझे सलाम, भारत हम को जान से प्यारा है, देस रंगीला, सुनो गौर से दुनियावालों... अशा देशभक्तिपर गीतांवर नृत्य करून बालचमूंनी देशभक्तीचे स्फुल्लिंग चेतविले. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ‘लोकमत बाल विकास मंच’ व कै. रघुनाथ खटावकर फौंडेशनच्यावतीने ‘चक दे’ डान्स स्पर्धेत वैयक्तिक प्रकारात सार्थक भिलारी व समूहनृत्यात पार्थ खोत ग्रुपने प्रथम क्रमांक पटकावला. डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतिभवन येथे झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन फौंडेशनचे अध्यक्ष सुयोग खटावकर, उपाध्यक्ष स्वप्निल पार्टे, सचिव सुधाकर पराते, सार्थक क्रिएशनचे सागर बगाडे व ज्युनिअर जॉनी लिव्हर यांच्या हस्ते झाले. वैयक्तिक व समूहनृत्य या दोन प्रकारांत ही स्पर्धा घेण्यात आली. यात वैयक्तिक नृत्यप्रकारात शिवम मगदूम, श्रीजा कुलकर्णी यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. समूहनृत्यात सायली सूर्यवंशी ग्रुप व विश्वजा डकरे ग्रुप या संघांना द्वितीय व तृतीय क्रमांक मिळाला. परीक्षक म्हणून सागर बगाडे यांनी काम पाहिले. यावेळी ज्युनिअर जॉनी लिव्हर यांनी मिमिक्री करून हसविले. कै. रघुनाथ खटावकर फौंडेशन या संस्थेच्या वतीने गरीब रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करून मोफत औषधे दिली जातात. गरजंूना शालेय साहित्य दिले जाते.
सार्थक भिलारी, खोत ग्रुप प्रथम
By admin | Published: August 15, 2015 12:22 AM