शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : राजकीय घडामोडींना वेग !महायुतीतील बड्या नेत्यांची दिल्लीत बैठक होणार;शिंदे दिल्लीला जाणार
2
पाकिस्तानात जोरदार संघर्ष, ७ दिवसांत १०० मृत्यू; कुर्रम जिल्ह्यात हिंसाचार पेटला
3
महाराष्ट्रात धक्कातंत्र? मुख्यमंत्री भाजपचाच होणार, पण नक्की कोणाला संधी?; पक्षातील ५ नावं स्पर्धेत
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
5
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
6
Stock Market Updates: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये तेजी; ऑटो शेअर्सवर दबाव
7
महायुतीच्या नव्या सरकारमध्ये गृहमंत्री कोण असेल? अजित पवार, एकनाथ शिंदे की....  
8
जम्मू-काश्मिरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा होणार; NSG कमांडो कायमस्वरूपी तैनात करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी
9
देशातील नंबर १ रेस्तराँ कोणतं? Anand  Mahindra यांचीही आहे गुंतवणूक; या यादीत घातलाय धुमाकूळ
10
शेअर बाजारातून चांगला रिटर्न मिळवण्याच्या मोहात गमावले ११ कोटी; अधिकाऱ्यासोबत काय घडले?
11
VI नंबर १, सन्मान कॅपिटल २, इंडियन ऑईल ३... ही अशी कोणती लिस्ट, ज्यात कोणालाही नकोय नाव?
12
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
13
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
14
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
15
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
16
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
17
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
18
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
19
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
20
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा

सतरा गावे होणार शंभर टक्के बायोगॅसयुक्त

By admin | Published: March 10, 2016 11:20 PM

जिल्हा परिषद : संकल्पना राबविण्यात कोल्हापूर जिल्हा राज्यात प्रथम, गतवर्षापासून योजना कार्यान्वित

आयुब मुल्ला -- खोची -जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात किमान एक-दोन गावे बायोगॅसयुक्त करण्याचे घेतलेले उद्दिष्ट कृषी विभागाने अंतिम टप्प्यात आणले आहे. सतरा गावांत बायोगॅसयुक्तची मोहीम हाती घेतली होती. यापैकी दोन गावे वगळता अन्य ठिकाणी जवळपास उद्दिष्टपूर्ती होत आली आहे. मार्चअखेर ती संपूर्णपणे होईल. राज्यात अशी मोहीम राबविणारा कोल्हापूर हा एकमेव जिल्हा ठरणार आहे.केंद्रपुरस्कृत राष्ट्रीय बायोगॅस विकास योजना गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत ती राबविली जाते. गेल्या आठ वर्षांत संपूर्ण राज्यात उद्दिष्टापेक्षा अधिक पूर्ती करण्यात जिल्हा परिषदेचा कृषी विभाग अग्रेसर राहिला आहे. त्यामुळे प्रथम क्रमांक राज्यात पटकाविण्याची परंपराही कायम राखली आहे.जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती व जाणीवजागृती झाल्याने चांगल्याप्रकारे योजनेला गती मिळाली आहे. संपूर्ण देशात कोल्हापूरकडे योजनेच्या माध्यमातून बायोगॅस योजनेचा यशस्वी पॅटर्न म्हणून पाहिले जाते. राज्यात एकूण ३५ जिल्हे आहेत. म्हणजे राज्याच्या एकूण उद्दिष्टांपैकी निम्म्यापेक्षा जास्त उद्दिष्ट जिल्ह्याला दिले जाते. त्याच्या पुढे जाऊन उद्दिष्टपूर्ती केली जाते. यापेक्षा अधिक नावीन्यपूर्ण ओळख व्हावी. योजना प्रत्येकाने राबवावी. ती घराघरांत पोहोचवावी या उद्देशाने प्रायोगिक तत्त्वावर प्रत्येक तालुक्यातील एक-दोन गावांत लोकसंख्येच्या आधारावर पात्र कुटुंबानुसार संख्या निश्चित करून उद्दिष्ट दिले. त्यानुसार ती संख्या २ हजार ४ इतकी आहे. यापैकी सुमारे सतराशेपेक्षा जास्त पूर्ण झाले आहेत. दोनशे अंतिम टप्प्यात आहेत. उर्वरित शंभर मार्चअखेर पूर्ण होतील.जिल्ह्यात ही योजना प्रभावीपणे राबविली जात आहे. बायोगॅसयुक्त ही संकल्पना राज्यात प्रभावीपणे राबविणारा कोल्हापूर एकमेव जिल्हा आहे. निवड केलेल्या गावांत चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. एक-दोन गावांत प्रमाण कमी आहे. मार्चपर्यंत त्यात वाढ झालेली दिसेल. शंभर टक्के बायोगॅसयुक्त गावे करून पहिल्या टप्प्यातील यश प्राप्त करू.- चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर.वाटचाल बायोगॅसयुक्तीकडेसतरांपैकी चार गावे बायोगॅसयुक्त झाली आहेत. ९० ते ९८ टक्क्यांपर्यंत वाटचाल केलेली सहा गावे आहेत. ८० ते ९० टक्क्यांपर्यंत पूर्ण झालेली पाच गावे आहेत. फक्त शिरोळ तालुक्यातील लाटवाडी गावात प्रमाण अत्यल्प आहे, तर गगनबावडा तालुक्यातील धुंडवडे गावात ४६ टक्के काम झाले आहे.