या विहिरीची खोली सुमारे ३५ फूट आहे. अंदाजे २५ फूट खोल असे दगडी बांधकाम असून आजही विहिरीचे बांधकाम मजबूत आहे. ग्रामस्थ पिण्यासाठी विहिरीतील पाण्याचा वापर करतात. विहिरीत गाळाबरोबर प्लास्टिक केरकचरा साचला होता. परिणामी विहिरीचे पाणी अस्वच्छ व दुर्गंधीयुक्त झाले होते. त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छ पाणी मिळणे आवश्यक होते. सध्या विहिरीच्या पाण्याची पातळी कमी झाली आहे. उर्वरित पाणी उपसा करून सुमारे दोन ट्रॉली गाळ व कचरा लोकसहभागातून काढल्याने विहीर स्वच्छ झाली असून पिण्याच्या पाण्याच्या विहिरीने बऱ्याच दिवसांनी मोकळा श्वास घेतल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.
विहीर स्वच्छ करण्यासाठी दीपक दमे, भगवान रामाणे, सदाशिव हांडे, दयानंद पाटील, सुनील रामाणे, संतोष नाईक, निलेश पाटील, अभिजित रामाणे, राजाराम पाटील, अजित नाईक, अरविंद शिंदे, जोतीराम शेळके, उमेश गुरव, भास्कर कांबळे, बाबासाहेब लाड, भाऊसो पाटील, संजय चव्हाण यांचे योगदान मिळाले.
फोटो ओळ- सातार्डे येथील गाव विहिरीची युवकांनी स्वच्छता केली.