शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
4
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
5
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
6
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
7
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
8
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
9
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
10
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
11
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
12
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
13
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
14
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
15
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
16
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
17
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
18
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
19
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
20
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य

सातारकरांना वाटतोय विश्वास; दाभोलकरांचेही मारेकरी सापडतील

By admin | Published: September 17, 2015 12:40 AM

कोल्हापूरच्या तपासाकडे लक्ष : हत्येचे गूढ उकलण्याची अपेक्षा

सातारा : कम्युनिस्ट नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासात पहिला दुवा हाती लागून बुधवारी सांगली येथील समीर गायकवाड याला अटक करण्यात आली. हल्ल्यानंतर सात महिन्यांनी पोलिसांना मिळालेल्या या उल्लेखनीय यशानंतर आता अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीतील अग्रणी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचे गूढही उलगडेल, अशी आशा सातारकरांसह परिवर्तनवादी कार्यकर्त्यांना वाटत आहे. कॉ. पानसरे यांच्यावर १६ फेब्रुवारी रोजी अज्ञात बंदूकधाऱ्यांनी हल्ला केला होता. पानसरे यांचे २० फेब्रुवारीला निधन झाले. हल्ल्यानंतर बरोबर सात महिन्यांनी १६ सप्टेंबरला याप्रकरणी पहिली अटक झाली. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येला दोन वर्षे उलटून गेली असून, मारेकऱ्यांचा आणि हत्येमागील सूत्रधाराचा अद्याप सुगावा लागलेला नाही. तथापि, डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे आणि कन्नड विचारवंत डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्यांमध्ये विलक्षण साधर्म्य आहे. तीनही घटना सकाळी लवकर घडल्या आहेत. तसेच हे तिघेही पुरोगामी विचारवंत असून, विचार दाबण्याच्या हेतूनेच या हत्या झाल्याचा आरोप तीनही वेळी झाला आहे. कॉ. पानसरे यांच्या हत्येशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध असल्याच्या संशयावरून पकडण्यात आलेला समीर गायकवाड ज्या विचारप्रणालीशी संबंधित आहे, त्याकडेच तीनही हत्यांच्या वेळी कार्यकर्त्यांनी अंगुलीनिर्देश केला होता. व्यक्तिगत कारणावरून या हत्या झाल्या असणे शक्य नाही, असेही ठासून सांगण्यात आले होते. त्यामुळे डॉ. दाभोलकरांच्या मारेकऱ्यांचा सुगावाही आता लागेल, अशी आशा कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत. डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्या कुटुंबीयांनी या दोन्ही हत्यांच्या तपासाबाबत असमाधान व्यक्त करून उच्च न्यायालयात एकत्रितपणे धाव घेतली होती. न्यायालयाने तपास यंत्रणांबाबत नाराजी व्यक्त करून तपासाबाबत ठोस माहिती देण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर काही दिवसांतच समीर गायकवाडला अटक झाली. न्यायालयाच्या दबावामुळे तपासचक्रे वेगाने फिरू लागली आहेत, असेही काही कार्यकर्त्यांना वाटत असल्याने डॉ. दाभोलकरांचे मारेकरीही समाजासमोर येतील, असा आशावाद ते व्यक्त करतात. (प्रतिनिधी)