- ,सतीश पाटील शिरोली - कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या ग्रामपंचायतींपैकी एक असलेल्या पुलाची शिरोलीत सत्तांतर झाले आहे. सतेज पाटील गटाकडून महाडिक गटाने सत्ता खेचताना तब्बल १८ जागांपैकी १७ जागा मिळवल्या आहेत. सरपंचपदासाठी पद्मजा कृष्णात करपे या ४ हजारांहून अधिक मतांनी विजयी झाल्या. तर रुपाली खवरे यांचा दारून पराभव झाला आहे.
शिरोली ग्रामपंचायत मध्ये सत्तांतर झाले असून सत्ताधाऱ्यांना एकच जागा मिळाली आहे. शाहू आघाडीचा दारुन पराभव झाला असून या निवडणुकीत मतदारांनी मतातून शाहू आघाडी वरील थेट नाराजी व्यक्त केली आहे. माजी आमदार अमल महाडिक, गोकुळ संचालिका शौमिका महाडिक यांची पूर्ण जादू चालली आहे. मागच्या निवडणुकीतील पराभवाचा वचपा महाडिकांनी या निवडणुकीत काढला आणि सगळी सत्ता हातात घेतली. शिरोलीत महाडिकांच्या मुळे भाजपची सत्ता आली आहे.
ही निवडणूक भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशीच होती. कृष्णात करपे हे भाजपाचे खंदे कार्यकर्ते आहेत तर अनिल खवरे हे शिवसेनेचे नेते तर शशिकांत खवरे हे राष्ट्रीय काँग्रेस चे असल्याने ही निवडणूक भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशीच झाली होती. यात भाजप विजयी झाले आहे.शाहू स्वाभिमानी आघाडीचा प्रभाग क्रमांक चार मध्ये शक्ती यादव हा एकच उमेदवार निवडून आला आहे. गावाने पाच वर्षांनंतर पुन्हा महाडिकांना सत्ता दिली आहे.