शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

पालकमंत्री म्हणून सतेज गेले, केसरकर आले; प्रस्ताव पडूनच राहिले

By समीर देशपांडे | Published: March 13, 2023 1:20 PM

सतेज पाटील हे अडीच वर्षे पालकमंत्री असताना त्यांनीही समिती स्थापन केली नाही

समीर देशपांडेकोल्हापूर : जिल्ह्यातील वृद्ध कलावंतांना मानधन देण्याआधी त्यांची निवड करण्यासाठी एक समिती असते. परंतु सतेज पाटील हे अडीच वर्षे पालकमंत्री असताना त्यांनीही समिती स्थापन केली नाही आणि दीपक केसरकर पालकमंत्री होऊन साडे पाच महिने झाले तरी त्यांनी याकडे लक्षच दिले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील बाराही तालुक्यांतील एक हजाराहून अधिक वृद्ध कलावंतांचे अर्ज पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्ये पडून आहेत.जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या वतीने ही वृद्ध कलावंतांना मानधन देण्याची योजना राबवली जाते. राष्ट्रीय, राज्य आणि जिल्हास्तरावरील कलावंतांची कामगिरी लक्षात घेऊन त्यांना वर्षाला कमीतकमी २७ हजार आणि अधिकाधिक ३७ हजार ८०० रुपये मानधन देण्यात येते. यासाठी कलावंतांची निवड करण्यासाठी एक समिती पालकमंत्र्यांनी स्थापन करावयाची असते.

यामध्ये पालकमंत्र्यांनी ज्येष्ठ कलाकार किंवा साहित्यिक अध्यक्ष म्हणून नेमावा अशी अपेक्षा असते. सदस्य म्हणून पालकमंत्र्यांनी आणखी एक ज्येष्ठ साहित्यिक, पाच ते सहा ज्येष्ठ कलावंत, जिल्हाधिकाऱ्यांनी नियुक्त केलेला वर्ग-१ चा एक अधिकारी हे या समितीचे सदस्य असतात. तर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी हे समितीचे सदस्य सचिव असतात.उद्धव ठाकरे यांचे सरकार २०१९ मध्ये सत्तेवर आले. त्यानंतर सतेज पाटील हे कोल्हापूरचे पालकमंत्री झाले. परंतु नंतरच्या अडीच वर्षांच्या काळात ही समिती स्थापनच करण्यात आली नाही. २०१९-२०, २०२०-२१ या दोन वर्षांतील बाराही तालुक्यांचे अर्ज पडूनच आहेत. त्यांची निवडच होऊ शकली नाही. त्यामुळे अनेक कलावंत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीकडे फेऱ्या मारून वैतागले आहेत.राज्यात सत्तांतर होऊन आता नऊ महिने झाले. साडे पाच महिन्यांपूर्वी दीपक केसरकर हे पालकमंत्री झाले आहेत. परंतु, याबाबत फारशा हालचाली नाहीत. मुळात हे फारसे लाभाचे पद नसल्याने या समितीकडे सर्वांचेच दुर्लक्ष होत राहिलेले आहे. परंतु शासनाची जर वृद्ध कलावंतांना मानधन देण्याची योजना आहे तर किमान मंत्र्यांनी लवकर समित्या स्थापन करून त्यांच्या वृद्धपणी तरी त्यांना दिलासा मिळेल हे पाहिले पाहिजे.

ह्यांची नावे यायचीत, त्यांची यायचीतसतेज पाटील पालकमंत्री असताना त्यांनी कॉंग्रेसची नावे तयार ठेवली होती. परंतु राष्ट्रवादी आणि शिवसेनेची नावेच लवकर आली नसल्याने ही समिती स्थापन होऊ शकली नाही असे सांगण्यात येते. याच विलंबाने समितीची स्थापना झाली नाही आणि तोपर्यंत सरकारच बदलले.

वृद्ध कलावंतांचे पडून असलेले तालुकावर अर्जराधानगरी - ३१९कागल - १८०करवीर - १४४हातकणंगले - ८६शिरोळ - ६३शाहूवाडी - ५७पन्हाळा - ५६भुदरगड - ४५आजरा - ४०गडहिंग्लज - ३७चंदगड - ३६गगनबावडा - ११

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलDeepak Kesarkarदीपक केसरकर guardian ministerपालक मंत्री