पत्रकात म्हटले आहे, मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने संचालकपदी झालेल्या निवडीची अंमलबजावणी करण्यास ‘गोकुळ’चे नेतृत्व करणारे सतेज पाटील व हसन मुश्रीफ हे दोन्ही मंत्री विरोध करत आहेत. यामागे राजकीय स्वार्थ आणि हिंदुत्वाला विरोध हेच कारण आहे. गोकुळ दूध संघाच्या शासननियुक्त स्वीकृत संचालकपदी माझी निवड झाली आहे. पण त्याची अंमलबजावणी दीड महिना झाला तरीही करत नाहीत? शिवसेनेबाबत आम्ही दुजाभाव करत नाही, असे म्हणणारे पालकमंत्री पाटील मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करण्याबरोबरच शिवसैनिकांच्या कामासंदर्भात किती फोन घेतात आणि किती दाद देतात, याचेही स्पष्टीकरण त्यांनी द्यावे. मंत्री मुश्रीफ यांनी तर ‘गोकुळ’च्या निवडणुकीत कागलच्या शिवसेनेच्या उमेदवाराला पाडले आणि पुन्हा त्यांचीच सहानुभूती मिळविली. हा पाठीत खंजिर खुपसण्याचा प्रकार त्यांनी केला आहे. आता मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आदेश डावलून मंत्री पाटील व मुश्रीफ यांनी केलेला अवमान तमाम शिवसैनिक कदापिही सहन करणार नसल्याचे या पत्रकात जिल्हाप्रमुख जाधव यांनी म्हटले आहे.
-
फोटो- २२ मुरलीधर जाधव