लोकमत.न्यूज नेटवर्कसरवडे : दत्ता लोकरे--- बिद्री ता.कागल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत करवीर मतदारसंघातील सात गावांचा समावेश आहे. या मतदारसंघावर प्रभाव असणा?्या आ.सत्तेज उर्फ बंटी पाटील आणि आ.अमल महाडीक याच्यातील रस्सीखेच या निवडणुकीत तीव्र होणार आहे.शिवाय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी.एन.पाटील यांचेही या गटावर वर्चस्व आहे. त्यामुळेच निवडणूक जरी बिद्रीची असले तरी पाटील आणि महाडिक गटाचा प्रभाव या गटावर असणार आहे.बदलत्या राजकीय समीकरणातुन या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि भाजप युती सोबत आ.अमल महाडिक यांची सर्व रसद असणार आहे. तर विरोधी माजी अध्यक्ष दिनकरराव जाधव यांच्या राजर्षी शाहू आघाडीला माजी आ. पी.एन.पाटील यांची ताकद मिळणार आहे. तर आ. सतेज पाटील ही महाडीक यांच्या विरोधात ताकद उभे करतील अशी शक्यता आहे. यामुळे येथे महाडिक आणि पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.तरीही बिद्रीच्या निवडणुकीत यापूर्वी कधीच करवीर मधील एकाही प्रमुख नेत्यांनी कोणत्याही आघाडीच्या व्यासपीठावर येऊन उघड प्रचार केला नाही. परंतु पाटील आणि महाडिक यांचे कार्यकर्ते मात्र बिद्रीच्या रणांगणात एकाकी झुंज देणार हे निश्चित.
गतपंचवार्षिक निवडणुकीत माजी आमदार दिनकरराव जाधव यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू आघाडीला माजी आमदार पी.एन. पाटील. यांच्या पाठिंबा होता . त्यांच्या कडून कृष्णात उर्फ बाळासाहेब पाटील(वडकशिवाले) याची उमेदवारी होती. तर विरोधी माजी आमदार के.पी. पाटील यांच्या महालक्ष्मी आघाडी ला आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांचा.पाठिंबा होता. त्याच्याकडून श्रीपती पाटील(निगवे खालसा) यांच्यात लढत झाली. त्यात श्रीपती पाटील हे २२ हजार ८८१ मते घेऊन विजयी झाले. तर कृष्णात पाटील यांना १६हजार ९२५ मते पडली. त्यामुळे महालक्ष्मी आघाडीचे पाटील हे ५ हजार ९५६ मते घेऊन विजयी झाले.सध्या करवीर तालुक्यातील सात गावांच्या राजकीय समीकरणात बदल झाला आहे. आता करवीर मतदार. संघात येवती हे एकमेव गाव आहे. तर उर्वरित सहा गावांचा समावेश हा दक्षिण मतदार संघात झाला आहे. पूर्वीच्या रचनेनुसार पी.एन.पाटील यांचे प्राबल्य दिसून येत होते. सध्या या विधानसभा मतदारसंघातून आमदार अमल महाडीक हे प्रतिनिधित्व करत आहेत. तर आमदार सतेज पाटील हे विधान परिषदेचे प्रतिनिधित्व करत आहेत. पी.एन.पाटील यांचा जाधव यांच्या आघाडीला पाठिंबा आहे तर राष्ट्रवादी व भाजप आघाडी असल्याने आम.महाडीक हे राष्ट्रवादी च्या आघाडीबरोबर विधान परिषदेचे आमदार पाटील यांच्यात पुन्हा संघर्ष दिसून येण्याची शक्यता आहे. तर दोन्ही आघाडी तून कोणत्या गटाला उमेदवारी यावर समीकरणांची जुळणी होणार आहे.त्यामुळे २८ सप्टेंबर च्या माघारीनंतर कार्यकर्त्यांच्या लढतीचे चित्र स्पष्ट होईल.बिद्रीच्या निवडणूकीत करवीर तालुक्यातील ७ गावांचा गट क्रमांक ७ मध्ये समावेश आहे. तर ३५१२ मतदार आहेत.सर्वाधिक १०९१ मतदार निगवे खालसा येथेआहेत.तर.बिद्रीसाठी एकूण मतदान ५७ हजार ८०९ इतके आहे.त्यामुळे निर्णायक मतदान असल्याने या गटाकडे. दोन्ही आघाडीचे लक्ष असणार आहे.गट क्रमांक ७ मधील गावे : निगवे खालसा १०९१, खेबवडे ६३५, चुये ५२३, कावणे ४४८, वडकशिवाले ४८९ ,इस्पूर्ली १३, येवती ३१२.यापूर्वी गत क्रमांक सात मधून प्रतिनिधित्व केलेले संचालक असे : १९९० ते ९५ :नामदेव कोंडीबा चौगले (निगवे.खालसा) ,१९९५ ते २०००: नामदेव कोंडीबा चौगले (निगवे खालसा) २००० त २००५ कृष्णात बंडू पाटील (वडकशिवाले) २००५ त २०१० :शशिकांत आनंदराव पाटील (चुये) ,२०१० त २०१५:श्रीपती बापू पाटील (निगवे खालसा)