शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

सॅटेलाईट प्रकल्प शेतकऱ्यांसाठी वरदान

By admin | Published: November 13, 2015 11:05 PM

विश्वास पाटील : उदगांव येथे गोकुळ दूध संघाच्या दुध प्रकल्पाचे उद्घाटन

जयसिंगपूर : ग्रामीण भागामध्ये गोकुळची सॅटेलाईल डेअरी ही ग्रामीण भागाचे महत्व वाढविणारी आसुन येथे एक लाख वीस हजार दुधाची प्रक्रिया होणारे प्रकल्प आहे. मुख्य शाखेनंतर उदगांव येथे प्रथमच सॅटेलाईल दुध डेअरी झाली असून ती शेतकऱ्यांना वरदान ठरणार आहे. तसेच संघाचे अर्थिक बचत करणारे आहे असे प्रतिपादन गोकुळ संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी केले.उदगांव (ता शिरोळ) येथे गोकुळ संघाची सॅटेलाईल डेअरीचे उद्घॉटन विश्वास पाटील व सौ. उर्मिला पाटील आणि विश्वास जाधव व सौ.उषादेवी जाधव यांच्या हस्ते विधीवत पूजाकरून प्रारंभ करण्यात आला. यावेळी पाटील बोलत होते. यावेळी संस्थेचे महाव्यस्थापक आर.सी.शहा म्हणाले, येथे ४० हजार लिटर दुध पॅकींग होणार आहे. गोकुळ संघाचा हा पहिलाच सॅटेलाईट असून येथून चिलींग प्रोसेसिंग व पॅकिंग होणार आहे व येथून मुंबई वाशी शाखेला एक ते दिड लाख दुध पुरवठा केला जाणार आहे. यामुळे गोकुळ संघाचा ताण कमी होणार आहे.या प्रकल्पात राष्ट्रीय कृषी विकास योजनेकडून १२ कोटी ५० लाखाचा आर्थिक अनुदान प्राप्त होत आहे. तर गोकुळ संघाकडून १३ कोटी ५० लाख रूपये असे एकूण २६ कोटीचे काम पूर्ण झाले आहे. येथे शिरोळ तालुक्यातून ५४ हजार ९००, सांगलीतून ३५६००, कर्नाटक १६०००, बल्क मिल्क कुलर १४२०० असे एकूण १ लाख २० हजार ७०० लिटर दूध येथे दररोज पुरवठा होते. तर गाईच्या टोन दुध सुधारणाकरण सुविधा उपलब्ध असल्याने ही एक महत्वाची योजना ठरली असून जानेवारी २०१६ मध्ये प्रात्यक्षिक घेवून प्रत्यक्ष दुध संकलनास प्रारंभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी गोकुळचे संचालक अरूण डोंगळे, पी. डी. धुंदरे, बाळासाहेब खाडे, उदय पाटील, रामराजे कुपेकर, सत्यजित पाटील, विलास कांबळे, रविंद्र आपटे, अमरिश घाटगे, बाबा देसाई, राजेश पाटील, अरूण नरके व कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर, महाव्यवस्थापक आर. सी. शहा, सुनिल पाटोळे यांच्यासह पदाधिकारी, कर्मचारी, संचालक उपस्थित होते. (प्रतिनिधी)