कोल्हापूर : दक्षिण महाराष्ट्रातील पहिल्या टेस्ट ट्यूबच्या निर्मितीचे संशोधन करणारे डॉ. सतीश पत्की यांच्या आणखी एका महत्त्वपूर्ण संशोधनाची आंतरराष्ट्रीय स्तरावर मानांकित असलेल्या अमेरिकन सोसायटी फॉर रिप्रॉडक्टीव्ह मेडिसीन या संस्थेने दखल घेतली आहे.
टेस्ट ट्यूब उपचारांमधील आधुनिक तंत्रज्ञान या त्यांच्या संशोधनाविषयीचे व्याख्यान या संस्थेच्या वार्षिक परिषदेमध्ये आयोजित करण्यात आले आहे. गेल्या २५ वर्षांमध्ये हे तंत्रज्ञान विकसित हाेत गेल्यामुळे टेस्ट ट्यूब बेबी उपचारामधील यशाचे प्रमाण अनेक पटीने कसे वाढत आहे, या विषयावर हे संशोधन करण्यात आले आहे. हे संशोधन फर्टिलिटी व स्टर्लिटी २०२० ऑबस्ट्रॅक्ट बुक या प्रसिध्द आंतरराष्ट्रीय नियतकालिकामध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.
१००२२१ कोल सतीश पत्की