संदीप आडनाईककोल्हापूर : तब्बल तीस वर्षांनंतर रविवारी सूर्यास्तानंतर शनि आणि शुक्राची युती झाली. हे दोन्ही ग्रह एकाच राशीत आल्यामुळे भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाची असलेली ही अवकाशातील घटना खगोलप्रेमींनी आपापल्या दुर्बिणीतून टिपली.रविवारी सायंकाळी सूर्यास्तानंतर सायंकाळी ७.१५ वाजल्यानंतर अंधार पडत असताना पश्चिमेकडे शुक्राच्या तेजस्वी चांदणीने आकाशात दर्शन दिले. त्याच्या अगदी जवळ वरच्या बाजूला पूर्वेस पिवळसर अंधुक शनिच्या चांदणीनेही दर्शन दिले.
हे दोन्ही ग्रह आकाशात अगदी जवळ आलेले दिसले तरी प्रत्यक्षात मात्र ते एकमेकांपासून कोट्यवधी किलोमीटर अंतरावर आहेत. या दोन्ही ग्रहांची मध्यरात्री युती झाली. या युतीत एक ग्रह दुसऱ्या ग्रहाच्या मागून पलीकडे भ्रमण करत जातो.
आज उलट परिस्थितीदरम्यान, आज, दि. २३ जानेवारी रोजी दुसऱ्या दिवशी याच्या उलट परिस्थिती दिसणार आहे. शनि ग्रह शुक्राला ओलांडून पश्चिमेकडे गेलेला दिसेल. या दिवशी शनि ग्रह शुक्राच्या खालच्या बाजूला दिसेल. त्याच्याबरोबर वरच्या बाजूला शुक्र ग्रह असेल. हे दोन्ही दिवस खगोल निरीक्षकांसाठी खूप महत्त्वाचे आहेत.
खगोलप्रेमींना या ग्रहांच्या स्थानात होणारा बदल उघड्या डोळ्यांनी चांदणीच्या स्वरूपात पाहता आला. दुर्बिणीतून हे दोन्ही ग्रह एकाच वेळी एकाच लेन्समधून पाहण्याची संधी त्यांना लाभली.