लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : संगम माहुली येथील श्री.बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आणि लोकसहभागातून जनतेच्या गरजेचा कैलास स्मशानभूमीला प्रकल्पाला १४ वर्षे पूर्ण होत आहेत. कोणताही सार्वजनिक प्रकल्प उभा करणे जेवढे महत्वाचे असते, त्यापेक्षा त्याची सातत्याने देखभाल करणे हे जास्त महत्वाचे आहे. या दोन्ही गोष्टी श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टने आपले कर्तव्य म्हणून गेली १४ वर्षे प्रामाणिक पणे पार पाडत आहे.राजेंद्र चोरगे यांनी श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून व आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेवून एक सुसज्ज, देखणी स्मशानभूमी उभारण्याचा निर्णय केला. ध्येय निश्चित होते, काय करायचे ते स्पष्ट होते. भव्य अशा स्मशानभूमीचा आराखय्ऋाही तयार झाला होता. तोच घेवून राजेंद्र चोरगे सहकारी जनतेत गेले. जनतेनेही त्यांनी भरभरून साथ दिली आणि बघता बघता त्यावेळी तब्बल १ कोटी रुपये खर्च करून अतिशय भ्नकम मात्र तितकीच देखणी आणि वनराईने वेढलेली स्मशानभूमी श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून, दानशूर सातारकरांच्या सहभागातून उभी राहिली.या स्मशान भूमीस कोणत्याही प्रकारचे शासकीय,निमशासकीय अनुदान बांधकामासाठी मिळाले नाही. तात्कालीन पालकमंत्री अजितदादा पवार, मदन भोसले त्याचबरोबर दिवंगत सुरेशदादा पळणीटकर, तात्कालीन जिल्हाधिकारी अनिल डिग्गीकर व जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप बंड, पत्रकार शरद काटकर, तसेच सर्वसामान्य सातारकरांचा सुध्दा मोलाचे सहकार्य व वाटा आहे.गुटखा, तंबाखू इत्यादी व्यसन करून कोणी आल्यास त्यास विनंती करून स्मशानभूमीतून बाहेर जाण्यास विनंती केली जाते. नागरिकांचे सुध्दा यासाठी चांगल्या प्रकारे सहकार्य मिळत असते. सीसी टी.व्ही च्या माध्यमातून थेट प्रक्षेपण पाहण्याची सुविधा सुध्दा याठिकाणी उपलब्ध असून अशा प्रकारची व्यवस्था राबविणारी महाराष्ट्रातील ही एकमेव स्मशानभूमी आहे. कैलास स्मशानभूमी परिसरातील लोकांची निस्वार्थी भावनेने व विना मोबदला सेवा करीत आहे. यासाठी श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संचालक, सदस्य राजेंद्र चोरगे, संजय कदम, उदय गुजर, नितीन माने, खंडेलवाल बंधू, सुधीर शिंंदे, विजय देवी, सुहास राजेशिर्के, अंबाजी देसाई, सुनील चतूर, सुनील खत्री, विजय पवार, दीपक मेथा, युवराज दबडे, बाळासाहेब नाईक प्रयत्नशील आहेत. १६ हजार ५00 मृतदेहांवर अंत्यसंस्कारकैलास स्मशानभूमी मध्ये आज पर्यंत १४ वर्षात १६५०० मृतात्म्यावर अंत्यविधी केले असून या सेवेसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. तसेच अत्यंत गरीब व बेवारस मृतातम्यावर अंत्यसंस्कार करणेसाठी मोङ्खत गोवरी पुरविल्या जात असतात. १२ वर्षापासून पारंपारिक पध्दतीने लाकय्ऋामध्ये दहन केला जात असलेला अंत्यविधी बंद करून शेण्याचा वापर करून दहन करण्यास सुरुवात केली. त्यावेळेपासून आजपर्यंत जवळ जवळ वीस हजार झाडे (१० वर्षे वाढ झालेली) वाचलेली आहेत. शेण आणि पालापाचोळा यापासून गोवरी तयार करण्यात येत असून याची जबाबदारी जिल्हयातील काही बचत गटांना देण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना रोजगार निर्मिती झाली आहे. यामुळे झाडांची होणारी कत्तल थांबनू प्रदूषण कमी होण्यास मदत होऊ लागली आहे.
सातारच्या कैलास स्मशानभूमीला १४ वर्षे पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2017 9:48 PM