कोल्हापूर : उत्तरप्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील दलित तरुणीवर बलात्कार करुन तिची निर्घृण हत्या केल्याच्या निषेधार्थ कोल्हापूर जिल्हा कॉग्रेस कमिटीच्या वतीने सोमवारी पापाची तिकटी येथील महात्मा गांधी यांच्य पुतळ्यासमोर सत्याग्रह केला. या आंदोलनात मोठ्या संख्येने कॉग्रेस कार्यकर्त्यांनी भाग घेतला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे या सत्याग्रहाचे नियोजन केले होते. महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस उपाध्यक्ष आमदार पी.एन. पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरात सकाळी अकरा ते दुपारी साडेबारा यावेळेत हे आंदोलन झाले.
प्रारंभी प्रदेश कॉग्रेसचे सरचिटणीस तौफिक मुल्लाणी यांनी सत्याग्रहामागची भूमिका स्पष्ट केली. उत्तरप्रदेशमधील हाथरसची घटना अतिशय निंदाजनक असून काँग्रेस पक्षाने त्या पिढीत तरुणीला न्याय मिळेपर्यंत शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण देशभर आणि राज्यातही कँग्रेसचे कार्यकर्ते सत्यागृह करत आहेत, असे मुल्लाणी यांनी सांगितले.यावेळी प्रदेश उपाध्यक्ष पी.एन. पाटील, महापौर निलोफर आजरेकर, जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, उपमहापौर संजय मोहिते, जिल्हा महिला सुप्रिया साळोखे, शहराध्यक्षा संध्या घोटणे, गटनेता शारंगधर देशमुख, सचिन चव्हाण, शोभा कवाळे, दुर्वास कदम, दिपक थोरात, करवीर पंचायत समिती सभापती अश्विनी धोत्रे, सुभाष बुचडे, संदीप पाटील, बजरंग रणदिवे, बाबुराव कांबळे उपस्थित होते.