आॅनलाईन लोकमतकोल्हापूर, दि. १९ : खंडोबा- वेताळ तालीम मंडळाच्यावतीने मर्दानी खेळाचे वस्ताद सुहास ठोंबरे यांच्या तिसऱ्या स्मृतीदिनानिमित्त शिवकालीन युद्धकला प्रात्यक्षिके सादर करीत त्यांच्या स्मृती जागवल्या. शिवाजी पेठेत झालेल्या या कार्यक्रमात ठोंबरे यांचे शिष्य परिवारापैकी किरण जाधव, जगदीश पटेल, दिलीप सरनाईक, सागर गायकवाड, जयसिंग मगदूम, भैय्या गायकवाड, राजेश पाटील, सौरभ घोसरवडे, अनिकेत जाधव, अथर्व जाधव, केदार ठोंबरे, शिवबा सावंत, शाहू सावंत, विकी गोळे, यश राऊत, सरला गायकवाड, स्नेहा नरके, सेजल नरके, शिवतेज ठोंबरे , दीप्ती जाधव, शिवानी ठोंबरे, सक्षम सावंत यांनी शिवकालीन युद्धकला प्रात्यक्षिके सादर करीत उपस्थितांची वाहवा मिळवली. वस्ताद बाळासाहेब शिकलगार व अशोक लोखंडे यांनी पोवाडा सादर केला. शाहीर मिलिंद सावंत यांनी वस्ताद ठोंबरे यांच्या कार्याची माहीती सांगितली. तर चित्रफलकाचे उदघाटन माजी नगरसेवक अजित राऊत, माजी उपमहापौर विक्रम जरग, सम्राट कोराणे, सागर कोराणे यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी ज्येष्ठ वस्ताद आनंदराव ठोंबरे, भरत जाधव, कृष्णात ठोंबरे, महेश चौगुले, संजय निकम, मनोज बालिंगकर, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंत मुळीक, बाबा चव्हाण,अच्युत साळोखे, अशोक पाटील, आदी उपस्थित होते.
युद्धकला प्रात्यक्षिकातून सुहास ठोंबरे यांच्या स्मृतींचे जतन
By admin | Published: March 19, 2017 3:07 PM