एकनाथ पाटील
कोल्हापूर : पावसाचा जोर कमी झाल्यानंतर महापुराचे पाणी कमी झाले, असे समजून कोल्हापूर-बंगळुरू महामार्गावर शिरोली पुलापासून 25 नागरिक आपल्या घराकडे जाण्यासाठी चालत निघाले होते. त्यावेळी, अचानक पाण्याच्या प्रवाहात स्वत:ला सावरणं शक्य न झाल्यामुळे ते पाण्याच्या प्रवाहात वाहून जात होते. त्याचवेळी, अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करुन या 25 जणांचा जीव वाचवला. रविवारी पहाटे साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, गेल्या 4 ते 5 दिवसांपासून ही लोकं पुरामुळे अडकून पडली होती.
महामार्गावरुन मार्ग काढत असताना घडलेल्या या अपघातानंतर हे लोक भेदरले असून त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. इस्लामपूरच्या पेठवडगाव परिसरातील हे सर्व नागरिक असून अग्निशमन दलातील जवानांच्यारुपाने त्यांना देवच भेटला. सुनिल वाईगडे, मनिष रणपिसे, मधुकर जाधव, तानाजी वडर, सुनिल यादव अभय कोळी, प्रमोद मोरे अग्निशमन दलातील या जिगरबाज अधिकाऱ्यांनी 25 नागरिकांचा जीव वाचवला.
या नागरिकांचा जीव वाचला.
पाहा व्हिडीओ -