कोल्हापूर : सावित्रीबाई फुले रुग्णालयात हृदयरुग्णांवर उपचार करणे आता सोपे झाले आहे. सेवाभावीवृत्तीने कार्डिओलॉजिस्ट डॉ. विदूर कर्णिक यांनी शनिवारपासून येथे उपचार देणे सुरू केले आहे. यामुळे गोरगरीब रुग्णांना चांगले उपचार मिळणार आहेत. शनिवारी सकाळी १० ते दुपारी १२ यावेळेत ते सेवा देणार आहेत.
सावित्रीबाई फुले रुग्णालयामध्ये नगरसेवक ईश्वर परमार यांच्या पाठपुराव्यामुळे महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी कार्डिओलॉजिस्ट डॉ. विदूर कर्णिक यांच्या नेमणुकीला परवानगी दिली. यामुळे ईसीजी, इको तपासणी येथे होणार आहे. क्रिटिकल रुग्णांवर मात्र सीपीआरमध्ये शस्त्रक्रिया केली जाणार आहे. हे सर्व उपचार मोफत असणार आहेत. त्यामुळ गोरगरीब, गरजू आणि ग्रामीण भागातील रुग्णांना या सुविधेचा लाभ होणार आहे. शनिवारी त्यांनी पहिल्याच दिवशी रुग्णांची तपासणी केली. तत्पूर्वी डॉ. मंजुश्री रोहिदास, डॉ. प्रकाश पावरा, डॉ. अनिरुद्ध काळेबेरे, डॉ.स्वप्निल जाधव, डॉ. आशा जाधव, माजी नगरसेवक ईश्वर परमार यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.