लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी कर्मकांड, रूढी, परंपरांना झुगारून स्त्रीयांसाठी शाळा सुरू करण्याचे क्रांतिकारी कार्य केले, असे प्रतिपादन प्रा. विजय काळेभाग यांनी रविवारी केले.
सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती समितीच्यावतीने बिंदू चौकात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डी. जी. भास्कर होते. काळेभाग म्हणाले, सावित्रीबाई आणि जोतिबांनी वंचित समाजाला ज्ञान देऊन दारिद्र्य संपविण्याचे महान कार्य केले. त्यावेळी सावित्रीबाईंना समाजाने त्रास दिला पण काळाने त्यांना न्याय दिला. अध्यक्ष डी. जी. भास्कर म्हणाले, उच्च समाजव्यवस्थेने नाकारलेल्या अस्पृश्यांना, स्त्रियांना, वंचित घटकांना साक्षर करण्याचे काम फुलेंनी केले.
यावेळी प्रा. विश्वास देशमुख, आपचे संदीप देसाई यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रा. शहाजी कांबळे, नंदकुमार गोंधळी, सोमनाथ घोडेराव, संजय जिरगे, संदीप देसाई, बाजीराव कांबळे, रमेश पाचगावकर, सुभाष देसाई तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.
---
फोटो ओळ :०३ बिंदू चौक
सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती समितीच्यावतीने बिंदू चौकात आयोजित कार्यक्रमात प्रा. विजय काळेभाग यांनी व्याख्यान दिले. यावेळी डी. जी. भास्कर, विश्वासराव देशमुख, प्रा. शहाजी कांबळे, सुभाष देसाई आदी उपस्थित होते.