कळंबा - सेवा, शुश्रूषा पुनर्वसन ब्रीदवाक्य जोपासत समाजातील उपेक्षित घटकांना हक्काचा आधार देणाऱ्या बेघरमुक्त कोल्हापूर, सुदृढ गाव योजना राबविणाऱ्या तीनशे वृद्धांचा सांभाळ करणाऱ्या पिरवाडी येथील सावली केअर सेंटरचे कार्य निश्चितच कौतुकास्पद असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार उदय कुलकर्णी यांनी व्यक्त केले. सावली केअर सेंटरच्या वतीने दिल्या जाणाऱ्या समाजातील ध्येयवेडे सेवाव्रती पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी किशोर देशपांडे होते.
यंदाचा पुरस्कार एक्कावन्न हजार रोख, तुकाराम गाथा,सन्मानचिन्ह सेवा संकल्प प्रतिष्ठान बुलढाणाचे संस्थापक नंदकुमार पालवे आरती पालवे यांना मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी आरोग्य दिनदर्शिका सेमिनार हॉलचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी डॉ गीता पिल्लाई, पद्माकर कापसे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळीसोनाली नवांगुळ यांनी सेवा संकल्प प्रतिष्ठानचे संस्थापक नंदकुमार पालवे आरती पालवे यांची प्रकट मुलाखत घेतली. अनाथ मनोरुग्ण बेघर बेवारस लोकांना कोणत्याही शासकीय मदतीशिवाय मोफत सेवा शुश्रूषा देणाऱ्या पालवे दाम्पत्यांचे योगदान श्रोत्यांना भारावून गेले.सूत्रसंचालन डॉ जयश्री कुराडे, आभारप्रदर्शन कुणाल सरावने यांनी व्यक्त केले. यावेळी सचिन शानभाग,माजी नगरसेवक अजित ठाणेकर,दत्तात्रय मेडसिंगे,सुरेखा राजेशिर्के, प्रसाद निगुडकर यांसह मान्यवर उपस्थित होते.
एक लाखाचा निधी सुपूर्द सेवा प्रतिष्ठाने पालवे दाम्पत्याचे विधायक कार्य पाहून भारावून गेलेल्या सावली केअर सेंटरचे उपाध्यक्ष पापा बनछोडे यांनी तात्काळ सेवा प्रतिष्ठानला एक लाखांचा धनादेश सुपूर्द केला.कोणत्याही शासकीय मदतीशिवाय विधायक समाज कार्यासाठी धडपडणाऱ्या अशा सामाजिक संस्थांना समाजातील दानशूर व्यक्तीनी सढळ हस्ते मदत करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. फोटो मेल केला आहे फोटो ओळ सावली केअर सेंटरच्या वतीने देण्यात येणारा समाजातील ध्येयवेडे सेवाव्रती पुरस्कार बुलढाणा येथील सेवा संकल्प प्रतिष्ठानचे संस्थापक नंदकुमार पालवे आरती पालवे यांना प्रदान करताना उदय कुलकर्णी यावेळी उपस्थित किशोर देशपांडे व अन्य मान्यवर