शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

पाणीदार कोल्हापूर पाणी बचतीकडे

By admin | Published: December 26, 2016 12:18 AM

शासनाच्या जागृतीचे फलित : ठिबकसाठी साडेसहा हजार प्रस्ताव

राजाराम लोंढे ल्ल कोल्हापूरदुष्काळाचे चटके सहन केल्यानंतर पाणीदार जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी पाणी बचतीकडे वळला आहे. गेल्या आठ महिन्यांत सूक्ष्म सिंचन योजनेतून (ठिबक) तब्बल ६ हजार ५५५ शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे प्रस्ताव पाठविले आहेत. शासनाच्या जाणीवजागृतीचे फलित म्हणून गतवर्षीच्या तुलनेत पाच हजार शेतकऱ्यांची वाढ झाली आहे. पाणी बचतीसाठी शेतकऱ्यांनी ठिबकचा वापर करावा, यासाठी केंद्र सरकारच्या वतीने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत गेले अनेक वर्षे प्रयत्न सुरू आहेत. या योजनेला शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला; पण पश्चिम महाराष्ट्रात विशेषत: कोल्हापूर जिल्ह्यात योजनेला फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. गेल्या वर्षी पाण्याची खरी किंमत कोल्हापूरकरांना कळली. गेल्या वर्षी केवळ १५२३ प्रस्ताव जिल्ह्यातून अनुदानासाठी कृषी विभागाकडे दाखल झाले होते; पण दुष्काळाचे चटके सहन केल्यानंतर शेतकरी ठिबककडे आकर्षित झाला आहे. ७ सप्टेंबर ते ६ आॅक्टोबर या कालावधीत शेतकऱ्यांकडून आॅनलाईन प्रस्ताव मागवण्यात आले होते. या कालावधीत तब्बल ६ हजार ५५५ शेतकऱ्यांनी ४ हजार ४४९ हेक्टरवर ठिबकचे प्रस्ताव दाखल केले आहेत. त्यापैकी आतापर्यंत २९ लाख ४९ हजारांचे अनुदान शेतकऱ्यांना मिळाले आहे. मागणी झाल्यास वाढीव मुदतएखाद्या जिल्ह्यातून ठिबकसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडे मागणी झाली तर त्यांना वाढीव मुदत दिली जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांना आॅनलाईन अर्ज भरता येत नसेल, तर त्यांनी नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा. प्रस्ताव भरून देणे कार्यालयातील कर्मचाऱ्यांना बंधनकारक राहणार आहे. मागासवर्गीय शेतकऱ्यांना वर्षभर मुदतअनुसूचित जाती व जमाती या प्रवर्गातील शेतकऱ्यांना ठिबकसाठी आॅनलाईन प्रस्ताव दाखल करण्यासाठी वर्षभर मुदत दिली आहे. याबाबतचा निर्णय नुकताच सरकारने घेतला आहे.असे मिळते अनुदानअवर्षण प्रवण क्षेत्राबाहेरील क्षेत्र - अल्पभूधारक शेतकरी (दोन एकर आतील) - एकूण खर्चाच्या ४५ टक्के. मोठे शेतकरी - ३५ टक्के. अवर्षणप्रवण क्षेत्रातील क्षेत्र - अल्पभूधारक - एकूण खर्चाच्या ६० टक्के. मोठे शेतकरी -४५ टक्के.