शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; मात्र सोलापुरात देवेंद्र फडणवीसांची एकही सभा नाही!
2
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
3
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
4
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
5
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
6
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video
7
विशेष मुलाखत: "संविधानाचे संरक्षण व्हावे यासाठीच आम्ही महायुतीसोबत"
8
Defence Stocks : HAL सह 'या' ३ स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, ९५ टक्क्यांपर्यंत देऊ शकतात रिटर्न
9
अनिल देशमुखांवरील हल्ला हे रचलेले कुंभाड; भाजपाचा संशय, आजच सखोल चौकशी करण्याची मागणी
10
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
11
मजबूत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात तेजी; IT, बँकिंग शेअर्समध्ये मोठी खरेदी
12
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
13
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
14
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
15
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
16
खोटे आरोप करून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न : अजित पवार 
17
आधी मलिदा काढला, सत्ता गेल्यावर विरोध सुरू; शिंदेंचा मविआवर घणाघात  
18
स्वेच्छानिवृत्ती किंवा बदली; तिरुपती बालाजी मंदिरातील गैर-हिंदू कर्मचाऱ्यांना स्पष्ट निर्देश
19
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
20
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."

पाचवी ते सातवीतील पुस्तकांचा तुटवडा

By admin | Published: July 26, 2016 11:58 PM

शिक्षकांसह विद्यार्थ्यांची गोची : शाळा सुरू होऊन एक महिना झाला तरी पुरवठा नाहीच

प्रकाश पाटील --कोपार्डे --मोफत व सक्तीचा शिक्षण कायदा २0१0 ने आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी पुस्तके देण्यात येतील, अशी घोषणा शिक्षकमंत्री विनोद तावडे यांनी केली होती. मात्र, शाळा सुरू होऊन सव्वा महिना झाला, तरी पाचवी ते सातवीच्या वर्गांतील हिंदी विषयासह अन्य काही पुस्तकेच उपलब्ध झालेली नाहीत. यामुळे शिक्षकांपेक्षा विद्यार्थ्यांसमोर पुस्तकाविना अभ्यास करायचा कसा, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.राष्ट्रभाषा म्हणून हिंदीला स्थान दिले गेले आहे. मराठी, इंग्रजी व हिंदी या तीन भाषांना अभ्यासक्रमात महत्त्वाचे स्थान आहे. मात्र, नेमके राष्ट्रभाषा असलेल्या हिंदी विषयालाच दुय्यम स्थान खुद्द शासनाकडून दिले जात असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. दरवर्षी विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागावी म्हणून नवीन चकचकीत पाठ्यपुस्तके देण्याचा उपक्रम आघाडी सरकारने सुरू केला. तोच उपक्रम भाजप-सेना युती शासनानेही सुरू ठेवला आहे. राज्यात सर्व शाळांमध्ये शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी आठवी पर्यंतच्या वर्गातील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके दिली जातील, अशी घोषणा खुद्द शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली होती. यासाठी आपल्या शाळेत असणाऱ्या संभाव्य पटसंख्येची माहिती वेळेत देण्याच्या सूचनाही शाळांना देण्यात आल्या होत्या.या सूचनेप्रमाणे शाळांनी आपल्याकडे असणाऱ्या विद्यार्थ्यांची संभाव्य पटसंख्या वर्गवार एप्रिल महिन्यातच सादर केली आहे. तरीही शिक्षण विभागाला या विद्यार्थी संख्येचा मेळ घालता आलेला दिसत नाही. बहुतांश शाळांमध्ये पटसंख्येपेक्षा कमी पाठ्यपुस्तके आली आहेत, तर काही पुस्तके उपलब्धच झालेली नाहीत. एक महिना शाळा सुरू होऊन झाला तरी पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना हिंदी विषयाचे पुस्तकच मिळालेले नाही. सहावीच्या सेमी इंग्रजी विभागाचे सायन्सचे पुस्तकही विद्यार्थ्यांना अद्याप मिळालेले नाही.पाचवीच्या ‘परिसर अभ्यास’ या विषयाची पुस्तकेही मागणीच्या ५0 टक्केच उपलब्ध झाली आहेत, तर सहावीच्या वर्गासाठी हीच अवस्था झाली आहे. सर्व विषयांच्या पुस्तकांबाबत अशी अवस्था झाली आहे. सातवीच्या वर्गासाठी इंग्रजी, गणित, इतिहास, नागरिकशास्त्र या पुस्तकांचीही पूर्ण पटसंख्येप्रमाणे उपलब्धता नाही. दरवर्षी स्वाध्याय पुस्तिका मिळत होती, ती यावर्षी मिळालेलीच नाही. वास्तविक १५ जूनला शाळा सुरू झाली असताना, जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत ही पुस्तके उपलब्ध व्हायला हवी होती; पण तसे न झाल्याने शिक्षक, विद्यार्थी व पालकांची गोची झाली आहे. सहावीचा अभ्यासक्रम बदललायावर्षी सहावीचा अभ्यासक्रम बदलला असून, आता मागील वर्षाची पुस्तके वापरणेही कठीण झाले आहे. काही शाळांनी शाळा सुरू होताच पाचवी व सातवीच्या वर्गांतील विद्यार्थ्यांकडून ही पुस्तके गोळा करून काम चालविले असले, तरी सर्व विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध झालेली नाहीत.दरवर्षी पुस्तके वेळेवर देण्याचा उपक्रम राबविला जायचा. यामुळे अभ्यासक्रम वेळेत सुरू व्हायचे. मात्र, यावर्षी काही पुस्तके मुलांना न मिळाल्याने मुले शिक्षकांना भंडावून सोडत आहेत. बाजारातून खरेदी करावीत आणि शासनाने दिल्यास पालकांना त्याचा आर्थिक भुर्दंड बसणार आहे. तसेच यावर शिक्षकही पुस्तके कधी मिळणार, हे सांगायला तयार नाहीत. त्यामुळे या विभागाचा भोंगळ कारभारच पाहायला मिळत आहे.- कृष्णात कुंभार, पालक, खुपिरे, ता. करवीर