शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
2
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस, अमित शाहांची बैठक टळली; एकनाथ शिंदे-अजित पवार आज दिल्लीला जाणार
3
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
4
संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक
5
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...
6
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला; एमएसआरडीसीकडून कामांचा धडाका
7
साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीत न जाता भाजपसोबत जाणे ही चूक; राज ठाकरेंसमोर पराभूत उमेदवारांची नाराजी
9
फेअर प्ले आयपीएलप्रकरणी मुंबई, ठाण्यासह  २१९ कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त
10
निवडणूक संपताच KDMC तील २ हजार कुटुंबांचे वास्तव्य धोक्यात; सामान्य बुडाले, बिल्डर मोकाट
11
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
12
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
13
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
14
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
15
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
16
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
17
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
18
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
19
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
20
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी

मंदिराच्या दानपेटीतील रकमेतून शालेय मुलांना दप्तर वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 11:45 PM

सांगली : देव हा भावाचा भुकेला असतो, असे म्हणतात. तरीही भाविक आपल्या इच्छेने मंदिरांच्या दानपेटीमध्ये यथाशक्ती दान करतातच. अशा ...

सांगली : देव हा भावाचा भुकेला असतो, असे म्हणतात. तरीही भाविक आपल्या इच्छेने मंदिरांच्या दानपेटीमध्ये यथाशक्ती दान करतातच. अशा दानातून मंदिरांचे व्यवस्थापक मंडळ वार्षिक खर्च भागवितात त्याचप्रमाणे सामाजिक उपक्रमही राबवितात. अशाच सामाजिक जाणिवेतून गव्हर्मेंट कॉलनीतील श्री दत्त मंदिर चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने अंगणवाडीतील मुलांना पोषण आहाराचे तसेच शालेय विद्यार्थ्यांना दप्तराचे वितरण करण्यात आले.गव्हर्मेंट कॉलनी येथील दत्त मंदिर परिसरात प्रसिध्द आहे. श्री दत्त मंदिर चॅरिटेबल ट्रस्टमार्फत येथील व्यवस्थापन पाहिले जाते. मंदिरात दानस्वरूपात जमा होणाऱ्या पैशातून प्रत्येकवर्षी शालेय मुलांसाठी रक्कम बाजूला काढून गरजू विद्यार्थ्यांना मदत केली जाते. यंदाही पंधरवड्यापूर्वी मंदिरातील दानपेटी उघडण्यात आली. यात जमलेल्या पैशातून आपणही समाजाचे काही देणे लागतो, या भावनेतून श्री रेवाप्पा दुर्गा कदम ज्ञानमंदिर शाळेतील इयत्ता पहिली ते सातवीतील ३० विद्यार्थ्यांना दप्तराचे वाटप करण्यात आले. तसेच हिरकणी अंगणवाडी क्र. १७२ मधील विद्यार्थ्यांना पोषण आहाराचे वाटप करण्यात आले.ट्रस्टचे अध्यक्ष शिवाजीराव जाधव, विलासराव सूर्यवंशी, धनपाल नांदणीकर, वसंत शिंदे, मल्लिकार्जुन घेवारी, शालिनी पवार, शंकरराव पाटील, आशालता जाधव, दादासाहेब जाधव यांच्याहस्ते मुलांना पोषण आहार तसेच दप्तराचे वाटप करण्यात आले.दत्त मंदिर परिसरातील हिरकणी अंगणवाडीतील लहान मुलांना पोषण आहारामध्ये खारीक, बदाम, बेदाणा, काजू, काळे बेदाणे अशी खाद्याची पाकिटे बनवून वाटण्यात आली. रेवाप्पा कदम ज्ञानमंदिर शाळेत ज्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक शुल्क भरण्याची ऐपत नाही, असे विद्यार्थी शोधून त्यांना त्याचा लाभ दिला जातो. याशिवाय रक्तदानासारखे सामाजिक उपक्रमही राबविले जातात.