यंदा शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी कोरोनाची दुसरी लाट आल्याने अद्याप इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात शाळेत जाता आलेले नाही. या विद्यार्थ्यांना शाळेत जाता येत नसल्याने आणि त्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यात मर्यादा येत असल्याने लक्ष्मी पाटील यांनी शिक्षण आपल्या घरी उपक्रम राबविण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी इयत्ता पहिलीच्या ‘अ’ तुकडीतील ३८ विद्यार्थ्यांच्या पालकांशी संवाद साधून त्यांची मान्यता घेतली. त्यावर पालकांकडून विद्यार्थी शैक्षणिक साधन साहित्याची निर्मिती करून घेतली. विद्यार्थ्यांच्या घरात वेगळ्या खोलीत अथवा एका कोपऱ्यात त्यांनी वर्गाची निर्मिती केली. तेथे चौदाखडी, जोडाक्षरे, पाढे, मूळाक्षरे, आदींबाबतचे तक्ते, शैक्षणिक साहित्य लावले. काहींनी तेथे पताका लावून सजावट केली. शाळेतील वर्गासारखी वातावरणनिर्मिती झाली. या विद्यार्थ्यांना सकाळी नऊ ते दहा या वेळेत ऑनलाईन शिक्षण आणि सकाळी अकरा ते सायंकाळी पाच या वेळेत विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांची स्वाध्याय तपासणी, शंका निरसन, मार्गदर्शन करणे सहायक शिक्षिका पाटील यांनी सुरू केले. त्याचा चांगला परिणाम झाला. दोन महिन्यांमध्ये हे विद्यार्थी लेखन, वाचन करू लागले. वर्तमानपत्रेदेखील वाचू लागली. कोरोनामुळे आपल्या पाल्याचे शिक्षण थांबणार ही पालकांची चिंता थांबली. या पद्धतीने कणेरीवाडी, कणेरी, कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहत परिसरातील सर्वसामान्य कुटुंबांतील विद्यार्थी शिक्षण घेत असून, त्यांच्यासह पालकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
चौकट
विद्यार्थी विकासाला बळ
‘शाळा आपल्या घरी’ उपक्रमामुळे इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहून त्यांच्या विकासाला बळ मिळत असून, त्याचे समाधान आहे. या उपक्रमासाठी मला गटशिक्षणाधिकारी एस. के. यादव, शिक्षण विस्तार अधिकारी विश्वास सुतार, मुख्याध्यापक राहुल ढाकणे, शाळा व्यवस्थापन समिती आणि सहकाऱ्यांचे पाठबळ मिळाल्याचे लक्ष्मी पाटील यांनी सांगितले.
प्रतिक्रिया
आम्ही कागल एमआयडीसी परिसरातील माळरानामधील पत्र्याच्या शेडमध्ये राहतो. शाळेच्या मदतीने शेडमधील एका खोलीत वर्ग निर्माण झाला. शाळा आपल्या घरी या शिक्षण पद्धतीमुळे माझा मुलगा सोहम अल्पावधीतच वाचन, लेखन करू लागला आहे. आम्ही खूप आनंदी आहोत.
-सीमा जावीर, पालक.
फोटो (०३०९२०२१-कोल-शाळा आपल्या घरी ०१, ०२) : कणेरीवाडी (ता. करवीर) येथील विद्यामंदिरमधील सहायक शिक्षिका लक्ष्मी पाटील यांच्या उपक्रमामुळे शाळाच विद्यार्थ्यांच्या घरात पोहोचली आहे.
फोटो (०३०९२०२१-कोल-लक्ष्मी पाटील (कणेरीवाडी)
030921\03kol_3_03092021_5.jpg~030921\03kol_4_03092021_5.jpg~030921\03kol_5_03092021_5.jpg
फोटो (०३०९२०२१-कोल-शाळा आपल्या घरी ०१, ०२) : कणेरीवाडी (ता. करवीर) येथील विद्यामंदिरमधील सहाय्यक शिक्षिका लक्ष्मी पाटील यांच्या उपक्रमामुळे शाळाच विद्यार्थ्यांच्या घरात पोहोचली आहे.फोटो (०३०९२०२१-कोल-लक्ष्मी पाटील (कणेरीवाडी)~फोटो (०३०९२०२१-कोल-शाळा आपल्या घरी ०१, ०२) : कणेरीवाडी (ता. करवीर) येथील विद्यामंदिरमधील सहाय्यक शिक्षिका लक्ष्मी पाटील यांच्या उपक्रमामुळे शाळाच विद्यार्थ्यांच्या घरात पोहोचली आहे.फोटो (०३०९२०२१-कोल-लक्ष्मी पाटील (कणेरीवाडी)~फोटो (०३०९२०२१-कोल-शाळा आपल्या घरी ०१, ०२) : कणेरीवाडी (ता. करवीर) येथील विद्यामंदिरमधील सहाय्यक शिक्षिका लक्ष्मी पाटील यांच्या उपक्रमामुळे शाळाच विद्यार्थ्यांच्या घरात पोहोचली आहे.फोटो (०३०९२०२१-कोल-लक्ष्मी पाटील (कणेरीवाडी)