कळे /कोल्हापूर : पोहायला गेलेल्या परखंदळे ( ता.पन्हाळा ) येथील प्रसाद गणपती देसाई ( वय - १६) या शालेय विद्यार्थ्याचा कुंभी नदी पात्रात बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवार ( दि. २२) रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास गोठे पुलाजवळ घडली. या घटनेमुळे परखंदळे पंचक्रोशीसह कळे विभागात हळहळ व्यक्त होत आहे.इ. १० वीच्या वर्गात शिकत असणारा प्रसाद हा गेले काही दिवसापासुन कुंभी नदी पात्रात पोहायला जात होता. त्याला आजून नीटसं पोहता येत नव्हतं. आज सकाळी मित्रांसोबत तो नेहमीप्रमाणे पोहायला गेला. पण पाण्यात गेल्यानंतर त्याला अंदाज आला नसल्याने तो गटांगळ्या खाऊ लागला. त्याचे मित्रपण दुर असल्याने त्याला बुडताना वाचवू शकले नाही. दोन तासांच्या प्रयत्नानंतर सकाळी सव्वानऊच्या सुमारास त्याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला.याबाबतची फिर्याद प्रसादचे नातेवाईक जगदीश दगडू पाटील यांनी कळे पोलिसांत दिली. घटनास्थळी कळे पोलीसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सीपीआरला पाठविला. दुपारी एकच्या सुमारास त्याच्यावर परखंदळे स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, वडील व दोन बहिणी असा परिवार आहे.कुटूबियांचा आक्रोश घटनास्थळी प्रसादच्या आई-वडील, बहिणी व कुटुंबीयांनी फोडलेला आक्रोश ह्रदय पिळवटून टाकणारा होता.घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची प्रसादचे वडील रोजंदारी करुन कुटूंबाचा उदरनिर्वाह कसाबसा चालवतात. एकुलता एक मुलगा प्रसाद याच्यासह दोन मुलींच्या शिक्षणासाठी अहोरात्र कष्ट करत आहेत. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. प्रसादच्या जाण्यामुळे देसाई कुटुंबावर नियतीने फार मोठा घाला घातला आहे.
शालेय विद्यार्थ्याचा कुंभी नदी पात्रात बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 1:45 PM
Accident Kolhapur : पोहायला गेलेल्या परखंदळे ( ता.पन्हाळा ) येथील प्रसाद गणपती देसाई ( वय - १६) या शालेय विद्यार्थ्याचा कुंभी नदी पात्रात बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवार ( दि. २२) रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास गोठे पुलाजवळ घडली. या घटनेमुळे परखंदळे पंचक्रोशीसह कळे विभागात हळहळ व्यक्त होत आहे.
ठळक मुद्देशालेय विद्यार्थ्याचा कुंभी नदी पात्रात बुडून मृत्यूपरखंदळे (ता.पन्हाळा ) येथील घटना, पंचक्रोशीसह कळे विभागात हळहळ