शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
2
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
3
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
4
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
5
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
6
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
7
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
8
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
9
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
10
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
11
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
12
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
13
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
14
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
15
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
16
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
17
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
18
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
19
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
20
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव

भंगार माफियांचा विळखा

By admin | Published: June 23, 2015 11:24 PM

बंद कारखान्यात बेकायदेशीरपणे थाटलेल्या एका भंगार गोदामात मागील आठवड्यात विषारी वायूची बाधा होऊन चार कामगारांचे बळी गेला होता.

लोसहभागातून विकास’ हे सूत्र घेऊन बहिरेवाडी (ता. पन्हाळा) येथील विद्यामंदिर ही जिल्हा परिषदेची शाळा वाटचाल करीत आहे. या शाळेत यश व गुणवत्ता सामावलेली असून, शाळेची इमारत इतकी सुसज्ज व प्रशस्त भौतिक सुविधांनी युक्त अशी उभी आहे. स्वच्छतागृहेही इतकी स्वच्छ आढळली की, थक्क व्हायला झालं. साफसफाई व स्वच्छता वरिष्ठ वर्गातील मुलं, मुली करतात. ‘स्वच्छता अभियान’ हे भौतिक तेच्या बाबींचे असले, तरी त्यातून श्रमाची लाज न वाटण्याचे संस्कार आणि ‘मनाची स्वच्छता’ याचे धडे देणारे ठरतील हे नक्कीच.शाळेत पहिली ते आठवी पर्यंतच्या वर्गात एकूण २१८ विद्यार्थी शिकत आहेत. मुलींची संख्या चांगली व शिक्षण घेण्याची ओढ, जिद्द आणि उत्साह लक्षात राहण्यासारखा. सर्वांगीण शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमांची अंमलबजावणी सुरू आणि त्याचे मूल्यमापनही केले जाते. शाळेची इमारत खूप प्रशस्त, आरसीसी, दुमजली, सुसज्ज अशी. आठ वर्ग खोल्या. हवेशीर, उजेडाला डोकावू देणाऱ्या खिडक्या आणि स्वच्छता तर नजरेत भरण्यासारखी. मुलांसाठी वरच्या वर्गातल्या त्यांच्या उंचीनुसार बेंच आहेत. ‘डिजिटल वर्ग’ हे विशेष लक्षात राहण्यायोग्य. सगळ्या विषयांचा समावेश व मुद्देसूद असे लेखन. एका मुलीला विचारलं ‘हे वर्ग कशासाठी ? भिंती मोक ळ््या नाहीत?’, तर तिनं उत्तर दिलं, ‘ मॅडम, हे अभ्यासासाठी तर महत्त्वाचं आहे. येता जाता डोळ्यासमोर वाचतोही आम्ही ’. ‘मीना-राजू मंच’ हा विशेष व उल्लेखनीय असा उपक्रम बहिरेवाडी शाळेत आढळतो. ‘सामाजिक जाणिवांचा विकास’ हा या मंचमागील खरा हेतू आहे. मुलांचा सामाजिक विकास व्हावा व तशा तऱ्हेने कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा प्रयत्न या शाळेने केला आहे. मीना-राजू मंचमार्फत लिंग समभाव मूल्य रुजावे. घरकामाची वाटणी करताना फक्त मुली नव्हे, तर मुलांवरही काही जबाबदारी सोपवावी. खेळणी, कपडे, खाऊ, आहार यासारख्या बाबींमध्ये मुलगा-मुलगी भेद नको, हा संदेश मिळावा म्हणून कार्यक्रम घेतले जावेत. महान कामगिरी करणाऱ्या स्त्रियांची चरित्रे वाचन, कथन केले जावे. बहिरेवाडी शाळेत हे सगळं शिक्षक मनावर घेऊन, मनापासून करीत आहेत. कर्तृत्ववान महिलांचे अनुभव कथन. पथनाट्यातून जाणीवजागृती ते लेक वाचवा. स्त्री- भ्रूणहत्येविरूद्घ प्रबोधनातून मुलींना शिक्षण घेऊ द्या हा नारा. मुलांनी मुलींची छेडछाड, टिंगलटवाळी करुनये, हे भाषण व नाट्यीकरणातून संस्कार केले जात आहेत. बालसभा, बाल आनंद मेळावा, करमणुकीचे कार्यक्रम, स्नेहसंमेलन आणि गुणी व प्रथम क्रमांकाने आलेल्यांना पारितोषिके हे या शाळेत नेटके व नियोजनपूर्वक होत आहे. हे क्षण टिपणारे फोटो आणि अहवालामध्ये शब्दांनी प्रतिबिंबित होत आहेत.बहिरेवाडी शाळेतील शिक्षक ज्या त्या विषयासंदर्भात प्रशिक्षण घेतात. प्रशिक्षणात मिळालेली माहिती, ज्ञान, उपक्रम, यावर स्टाफ रूममध्ये चर्चा होते. सर्व शिक्षकांना संदर्भ मिळतात. प्रशिक्षणाचे आणि आपल्या शाळेत ते कसं विद्यार्थ्यांसाठी राबविता येईल, यावर विचारमंथन होते. ‘सामूहिक निर्णय व जबाबदारी’ हे शाळा दर्जेदार व गुणवत्ता विकास होण्यामागील कारण आहे. विज्ञान प्रदर्शनात सहभाग, क्रीडा स्पर्धांमध्ये भाग, वक्तृत्च, निबंध स्पर्धांचे आयोजन, ‘विज्ञान जत्रा’, अशासारखे उपक्रम राबविले जात आहेत. एल.सी.डी. प्रोजेक्टरच्या साह्याने अध्यापन आणि ई-लायब्ररीच्या साह्याने अवांतर वाचन यावर भर देणारे शिक्षक हे बहिरेवाडी विद्यामंदिरचे विशेष.- डॉ. लीला पाटीलशाळेची वैशिष्टयेलोकसहभागातून एलसीडी आहे, शाळेत आणि वापरात. संगणक कक्ष, ई-लर्निंग अगदी मुलामुलींसाठी आवडीने आणि प्रत्यक्ष हाताळण्याची संधी दिली जाते. बालसभा घेतल्या जातात. त्यातील काही कार्यक्रम २-३ मिनिटांत दुसरी ते चौथीच्या मुला-मुलींनी सांगितले. बालसभेचे फोटो, अहवाल व्यवस्थापन चांगले आढळले. माता-पालक बैठक नियमानुसार नव्हे,तर त्याहून अधिक घेतल्या आहेत. पालक- शिक्षक संघाच्या बैठका, त्यात चर्चिलेले विषय, केलेली कार्यवाही याविषयी अहवाल तारीख, महिनानिहाय वाचायला मिळाला. मुख्य व विशेष उल्लेखनीय दोन उपक्रम ते म्हणजे ‘कला कार्यानुभव’ या उपक्रमांचा अर्थ जाणून घेऊन शिक्षकांनी आपल्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांकडून विविध वस्तू तयार करण्यात विशेष रस घेतला आहे. हस्त कौशल्याने मातीकाम, बांबूकाम, दोर व काथ्याकाम, वाळलेल्या फळांपासून वस्तू, रंग देऊन मांडलेल्या घरगुती वापराच्या वस्तू, विज्ञानातील प्रयोगाची प्रारूपे आहेत. मांडणी करून ठेवलेल्या या वस्तू म्हणजे मुलांच्या मेंदू, हात, मनगट यातून परिश्रमाने साकारलेले सुप्त कलागुणांचे दालन.‘शिवी बंद’ असा उपक्रम खूप वेगळा व मुलांच्या भवितव्यासाठी शिकवण देणारा आहे. शाळेत कोणताही विद्यार्थी शिवी देत नाही, तर प्रार्थना परिपाठाच्यावेळी ‘शिवी बंद’ शपथ घेतली गेली आहे. ती शपथ पाळली जात आहे.