शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काँग्रेस-ठाकरे गटातील वाद मिटणार? प्रभारी रमेश चेन्नीथला ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल
2
हमासचा नवा प्रमुख याह्या सिनवारचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला; दातांनी ओळख पटली नाही म्हणून बोटांनी...
3
"संजय राऊत आणि आमच्यात वाद नाही, पण..." नाना पटोले यांनी स्पष्ट केली भूमिका
4
गर्लफ्रेंडच्या घरी प्रेमीयुगुलाची भेट, पण कुटुंबीयांनी रंगेहाथ पकडलं; बॉयफ्रेंडला पेटीत लपवलं...
5
एकमेकांची वाट पाहण्यात सगळ्यांच्या उमेदवार याद्या लांबल्या; ही दोन कारणंही महत्वाची
6
OTT साठी Reliance ची मोठी तयारी, JioCinema चं डिस्ने+ हॉटस्टारमध्ये विलीनीकरण होणार
7
जातीवर मत मागायची वेळ येईल, त्यादिवशी राजकारण सोडून देईल; धनंजय मुंडेंची भावनिक साद
8
रशिया युद्धात उत्तर कोरियाही, पाठविले १२ हजार सैनिक; दक्षिण कोरियाच्या गुप्तचर संस्थेचा दावा
9
दीड, दोन गुंठ्यात बांधलेले अप्रतिम घर; हॉल, बेडरुमही प्रशस्त... कसे बांधाल, एकदा पाहूनच घ्या ना...
10
खेडमध्ये सर्वपक्षीय विरोधक एकवटले, दिलीप मोहिते-पाटलांविरोधात देणार नवा पर्याय
11
भारताची 'युवासेना' आज पाकिस्तानशी भिडणार; टीम इंडिया पराभवाचा वचपा काढणार? जाणून घ्या सर्वकाही
12
नारायण मूर्तींनी टाटांचा दयाळू उद्योजक म्हणून केला उल्लेख; सांगितला १९९९ चा 'तो' किस्सा
13
जिंकलंस भावा! टीम इंडिया अडचणीत असताना मुंबईकर Sarfaraz Khan नं ठोकली सेंच्युरी
14
IPO पूर्वीच NSDL नं रचला इतिहास; भारत, जपान, जर्मनीच्या GDP पेक्षा अधिक झाल्या सिक्युरिटीज
15
घासून निघालेल्या जागांचे काय? पाच हजार मताधिक्यांच्या आतील ३७ मतदारसंघांचे निकाल ठरणार अधिक महत्त्वाचे
16
सायकलस्वाराला वाचवताना भीषण अपघात, ५३ प्रवाशांना घेऊन जाणारी बस कोसळली नदीत
17
"विलेपार्लेची जागा शिंदेगटाला सोडा", माजी मंत्री दीपक सावंत यांनी घेतली जे. पी. नड्डा यांची भेट
18
आचारसंहितेमुळे योजनादूतांमार्फत प्रचार थांबवा; आयोगाची सूचना 
19
Rishabh Pant चुकला; त्याची विकेट वाचवण्यासाठी Sarfaraz Khan उड्या मारत ओरडताना दिसला
20
"संजय राऊत उद्धव ठाकरेंपेक्षा मोठे नेते"; पटोलेंच्या विधानावर राऊत म्हणाले, "त्यांच्या परवानगी शिवाय..."

स्कॉटलँड फॉरेन्सिक लॅबमध्ये पुंगळ्यांची तपासणी होणार

By admin | Published: May 05, 2016 1:04 AM

न्यायालयाची परवानगी : २० मे रोजी समीर विरोधात दोषारोपपत्र

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे, डॉ. नरेंद्र दाभोलकर व डॉ. एम. एम. कलबुर्गी या तिन्ही हत्यांच्या तपासातील पुंगळ्यांची (काडतुसे) इंग्लंडमधील न्यू स्कॉटलँड फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. ‘सीबीआय’ने पुण्यापाठोपाठ कोल्हापुरातील सत्र न्यायालयात अर्ज करून त्यासंबंधी परवानगी मागितली होती. त्यास अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांनी बुधवारी मंजुरी दिली. या तिन्ही हत्यांचा तपास परदेश स्तरावर पोहोचल्याने गुन्ह्याची व्याप्ती वाढली आहे. दरम्यान, पानसरे हत्येप्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाड याच्या विरोधात शुक्रवारी (दि. २० मे) रोजी दोषारोपपत्र निश्चित करण्यात येणार आहे. पानसरे यांच्या हत्येप्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाड याच्या विरोधात दोषारोपपत्र निश्चित करण्याच्या निर्णयावर बुधवारी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश बिले यांच्या दालनात सुनावणी झाली. ‘सीबीआय’चे अप्पर पोलिस अधीक्षक एस. आर. सिंग यांनी बंगलोर व मुंबई फॉरेन्सिक लॅबमधून पानसरे, डॉ. दाभोलकर व डॉ. कलबुर्गी या तिन्ही हत्यांचा तपासातील पुंगळ्यांचे अहवाल वेगवेगळे आले आहेत. त्यामुळे आम्ही इंग्लंडमधील न्यू स्कॉटलँड फॉरेन्सिक लॅबमधून पुन्हा तपासणी करून अहवाल मागवून घेणार आहे. त्यासाठी पुणे न्यायालयाने मंजुरी दिली आहे. पानसरे हत्येप्रकरणातील पाच पुंगळ्या तपासण्यासाठी मंजुरी द्यावी, असा अर्ज सत्र न्यायालयाकडे केला होता. त्यास न्यायाधीश बिले यांनी मंजुरी दिली. पानसरे हत्येप्रकरणातील पाच, डॉ. दाभोळकर व कलबुर्गी प्रत्येकी दोन अशा नऊ पुंगळ्यांची (काडतुसे) पुन्हा तपासणी करण्यात येणार आहे. उच्च न्यायालयाचे आदेशाची प्रत पाहून समीर गायकवाड विरोधात दोषारोपपत्र निश्चित करण्यासाठी (दि.२० मे) रोजी ठेवण्यात आल्याचे न्यायाधीश बिले यांनी सांगितले. याप्रसंगी अप्पर पोलिस अधीक्षक चैतन्या एस., ‘सीबीआय’चे पोलिस निरीक्षक चंद्रकांत घोडके, मेघा पानसरे, आदी उपस्थित होते.