शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
3
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
4
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
5
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
6
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
7
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
8
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
9
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
10
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
11
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
12
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

कारखान्यांची धुराडी थंडावली

By admin | Published: March 03, 2017 11:42 PM

उताऱ्यात अर्धा टक्क्याने घट : साखर उताऱ्यात सहकारीपेक्षा खासगी कारखान्यांची आघाडी

प्रकाश पाटील -- कोपार्डे --कोल्हापूर विभागात उसाच्या उत्पादनात प्रचंड घट झाल्याने यावर्षी २०१६-१७चा हंगाम फेब्रुवारी महिन्यातच गुंडाळला आहे. मागील वर्षी (२०१५-१६)च्या हंगामपेक्षा तब्बल ७५ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप कमी झाले आहे. सरासरी साखर उताऱ्यातही ०.४२ टक्क्यांनी घट झाल्याने साखर उत्पादनही एक कोटी एक लाख ५१ हजार ३१५ क्विंटलने कमी झाले. साखर उताऱ्यात सहकारी पेक्षा खासगी साखर कारखान्यांनी आघाडी घेतल्याचे चित्र आहे. मागील वर्षी २०१६ मध्ये एप्रिल, मे मध्ये दुष्काळसदृश परिस्थितीने शेतीसाठीच्या पाणी उपशावर बंदी घालण्यात आली. यामुळे उसाची उभी पिके करपली होती. त्यातच संभाव्य पाणीटंचाई ओळखून शेतकऱ्यांनीही ऊस लागवडीला फाटा दिला होता. याचा परिणाम १० ते १५ हेक्टरवरील उसाचे क्षेत्र कोल्हापूर जिल्ह्यातील कमी झाले होते, तर जून-जुलैमध्ये झालेल्या प्रचंड पावसाने ऊसपीक वाढीला खो बसला होता. याचा एकत्रित परिणाम साखर कारखान्याच्या गाळप हंगामावर झाला आहे. कोल्हापूर विभागातील एक-दोन कारखाने वगळता सर्वच कारखान्यांचे गाळप हंगाम फेब्रुवारीच्या दुसऱ्याच आठवड्यात गुंडाळले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील दत्त शिरोळ, शाहू कागल, तर सांगली जिल्ह्यातील रा. बा. पाटील साखराळे युनिट-१ हे तीन कारखाने सुरू असले तरी येत्या चार दिवसांत हे कारखानेही बंद होणार आहेत. यावर्षी कोल्हापूर विभागातील ४१ साखर कारखान्यांपैकी ३६ साखर कारखान्यांनी आपला गाळप हंगाम यशस्वीरीत्या पूर्ण केला. पैकी कोल्हापूर जिल्ह्यातील दोन, सांगली जिल्ह्यातील एक पूर्णत: बंद राहिले व दोन कारखान्यांचे गाळप हंगाम सुरू झाले तरी उसाअभावी बंद पडले. या हंगामात कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केल्यास २३ कारखान्यांपैकी २१ कारखान्यांनी आपले गाळप हंगाम पूर्ण केले असून, १ कोटी २ लाख ३ हजार ४४ मेट्रिक टन उसाचे गाळप करून ११.९९ च्या सरासरी उताऱ्यासह एक कोटी २० लाख २१ हजार ८६७ मेट्रिक टन उसाचे साखर उत्पादन केले आहे. जवाहर, हुपरी कारखान्याने कोल्हापूर विभागात सर्वांत जास्त १३ लाख ८६ हजार ५१० मे. टन उसाचे गाळप करून आघाडी घेतली आहे, तर वारणा १३ लाख २८ हजार ७२० मे. टन उसाचे गाळप करून द्वितीय व दत्त शिरोळ ८ लाख ३५ हजार २४५ मे. टन उसाचे गाळप करून तिसऱ्या स्थानावर आहे. साखर उताऱ्यात गुरुदत्त टाकळीने १३.०० टक्के सरासरी उतारा मिळवून प्रथम, तर कुंभी-कासारी, कुडित्रेने १२.८० उतारा मिळवीत दुसरा व बिद्री १२.६७ टक्के उतारा मिळवीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. ऊस गाळपात कोल्हापूर जिल्ह्यात विक्रमी घट झाली असून कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल ४६ लाख ३९ हजार ७२६ मेट्रिक टन उसाचे कमी गाळप झाले आहे. सांगली जिल्ह्यातही अशी परिस्थिती असून, अठरा साखर कारखान्यांपैकी १५ साखर कारखान्यांनीच आपले गाळप हंगाम पूर्ण केले आहेत. एक बंद, तर दोन साखर कारखान्यांनी उसाअभावी गाळप हंगाम सुरू करून बंद केले आहेत. सांगली जिल्ह्यात ४९ लाख ५३ हजार ८८९ मे. टन उसाचे गाळप झाले असून, मागील वर्षीपेक्षा ३० लाख ३२ हजार ५८९ मेट्रिक टन ऊस गाळप कमी झाले आहे. सर्वाेदय रा. बा. पाटील युनिट-३ कारखान्याने साखर उतारा १२.७५टक्के मिळवीत चांगली कामगिरी केली आहे. ऊस गाळपात ‘जवाहर’, हुपरी, तर सरासरी साखर उताऱ्यात ‘गुरुदत्त’ टाकळीची आघाडीकोल्हापूर जिल्ह्यात तब्बल ४६ लाख ३९ हजार ७२६ मेट्रिक टन उसाचे कमी गाळपकोल्हापूर जिल्हा एकूण साखर कारखाने २३हंगामहंगाम सुरूबंदएकूण उसाचे गाळप साखर उत्पादनसरासरी साखर केलेले कारखानेकारखाने(मेट्रिक टन)(क्विंटलमध्ये)उतारा२०१६-१७२१०२१ कोटी २३ हजार ४४१ कोटी २० लाख २१ हजार ८६७११.९९२०१५-१६२१०२१ कोटी ४६ लाख ३१ हजार ५९३१ कोटी ८४ लाख ७३ हजार ५१२.६०सांगली जिल्हा एकूण साखर कारखाने १८हंगामहंगाम सुरूबंदएकूण उसाचे गाळप साखर उत्पादनसरासरी साखर केलेले कारखानेकारखाने(मेट्रिक टन)(क्विंटलमध्ये)उतारा२०१६-१७१५०३४९ लाख ५३ हजार ८८९५९ लाख ३३ हजार ४६३११.९८२०१५-१६१७०१७९ लाख ८६ हजार ४७८९६ लाख ३३ हजार ६४०१२.०६