शुक्रवारपर्यंत झालेले शाखानिहाय प्रवेश
विज्ञान : ८६०
वाणिज्य (इंग्रजी) : २०६
वाणिज्य (मराठी) : ३०२
कला (मराठी) : ३०९
कला (इंग्रजी) १८
एकूण : १६९५
चौकट
‘आयटीआय’ची गुणवत्ता यादी जाहीर
जिल्ह्यातील शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) विविध अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी शुक्रवारी दुपारी तीन वाजता प्रसिद्ध झाली. विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेल्या अभ्यासक्रमांची माहिती त्यांना एसएमएसद्वारे आयटीआयने कळविली. या फेरीतील प्रत्यक्ष प्रवेशाची प्रक्रिया आज, शनिवार ते सोमवार (दि. ७) पर्यंत चालणार आहे.
चौकट
‘पॉलिटेक्निक’साठी आज अखेरचा दिवस
शासकीय आणि खासगी तंत्रनिकेतनमधील (पॉलिटेक्निक) प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची आज, शनिवारी अंतिम मुदत आहे. तात्पुरती गुणवत्ता यादी सोमवारी (दि. ७) जाहीर होणार आहे.
फोटो (०४१२२०२०२-कोल-शहाजी कॉलेज फोटो) : कोल्हापुरात शुक्रवारी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेची गती वाढली. शहरातील शहाजी कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी अकरावीचे प्रवेश निश्चित केले. (छाया : आदित्य वेल्हाळ)