कोल्हापूर : येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये सलग दुसऱ्या शुक्रवारी अधिकारी- कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेनंतर सुमारे एक तास स्वच्छता मोहीम राबवून परिसर स्वच्छ केला.
प्रशासकीय इमारतीमध्ये विविध विभागांचे २० कार्यालये असल्याने परिसरात मोठा कचरा पसरलेला असतो. वरिष्ठ भूवैज्ञानिक ऋषिराज गोसकी यांनी स्वच्छता मोहिमेची संकल्पना मांडली होती. मकर संक्रांतीच्या निमित्ताने उपक्रमाला सुुरुवात झाली. सलग दुसऱ्या शुक्रवारी सुमारे एक तासभर परिसराची स्वच्छता करण्यात आली.
या मोहिमेत अमित देशपांडे, शहर पुरवठा अधिकारी माधवी शिंदे यांच्यासह भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, जिल्हा माहिती कार्यालय, विभागीय माहिती कार्यालय, मुद्रांक कार्यालय, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, विशेष लेखा परीक्षक, जिल्हा प्राधिकरण, उपसंचालक आरोग्य या कार्यालयातील अधिकारी- कर्मचाऱ्यांनी श्रमदान केले.
-
फोटो नं २२०१२०२१-कोल-स्वच्छता अभियान०१
ओळ : कोल्हापुरातील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत अधिकारी- कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी परिसराची स्वच्छता केली.
--