शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प आणि हार्वर्ड विद्यापीठातील संघर्ष शिगेला! विद्यापीठाने ट्रम्प प्रशासनावरच भरला खटला; वाद काय?
2
तुमच्याकडे ५०० रुपयांची नोट खरी आहे की खोटी? गृह मंत्रालयाने इशारा दिला
3
वाल्मीक जेलमध्ये, तरीही कार्यकर्त्यांची दहशत सुरूच; बीडचे DYSP गोल्डे यांच्या जबाबाने खळबळ
4
बापरे! भारतात नव्हे तर जगात चंद्रपूर शहर ठरले सर्वात उष्ण; एप्रिलमध्येच पारा ४५.६ अंश
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ एप्रिल २०२५: कोणत्याही कामात यश मिळेल, आर्थिक फायदा होईल
6
अधिकारांत हस्तक्षेप करीत असल्याचे आमच्यावर आरोप; न्या. भूषण गवई यांनी नोंदवले निरीक्षण
7
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजसमोर जवाहरलाल दर्डा यांचा पुतळा; आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार अनावरण
8
GST सह सोन्याचा दर पोहचला १,००,००० प्रति तोळा; ग्राहकांना २० टक्के परतावा
9
रस्ते काँक्रिटीकरणामुळे खड्डे भरण्याच्या खर्चात १४० कोटींची घट; यंदा ७९ कोटींचीच निविदा
10
धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचं निधन; भारतात २२ ते २४ एप्रिल असा ३ दिवस राष्ट्रीय दुखवटा
11
अश्विनी बिद्रे हत्याप्रकरणी नवी मुंबई पोलिस दलातील तपास अधिकाऱ्यांवर ताशेरे
12
२१ वर्ष पूर्ण झालेल्या नव्याने पात्र ठरणाऱ्या ‘लाडक्या बहिणीं’ना केव्हा मिळणार लाभ?
13
विमानतळावर ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांना नाहक त्रास नको; हायकोर्टाने कंपन्यांना फटकारले
14
कुजबुज! ठाकरे बंधूंना टक्कर देण्यासाठी शिंदे ब्रँडचेही सोशल मीडियावर ब्रँडिंग सुरू
15
प्रेमसंबंध, हत्या अन् मृतदेहाचे तुकडे; तांत्रिक पुराव्यामुळे फुटले अभय कुरुंदकरचे बिंग
16
क्रांतिकारी मेंढपाळ गेला! अत्यंत मृदू आणि अतूट श्रद्धेचा एक स्वर कायमचा शांत झाला
17
चॅटजीपीटीचा वापर करून २ बहिणींनी केली कमाल; वाचवले तब्बल १० हजार डॉलर्स
18
‘पॉवर’ दाखवा, पृथ्वीला मूठभर अब्जाधीशांच्या आर्थिक दादागिरीतून सोडवा!
19
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
20
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत

महाडिक-मंडलिक यांची दुसरी पिढी २५ वर्षांनी एकत्र, पक्षीय पेक्षा सोयीच्या राजकारणावर जोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2024 13:01 IST

महाडिक-मंडलिक कधी सोयीने एकत्र आले तर कधी एकमेकांविरुद्ध लढले

कोल्हापूर : नव्वदच्या दशकात महाडिक-मंडलिक जोडीला जिल्ह्याच्या राजकारणात मसल आणि मनीपॉवर म्हणून ओळखले जात होते. या जोडगोळीने जिल्ह्यातील अनेक संस्थांवर राजकीय वर्चस्व प्रस्थापित केल्याने मूळ काँग्रेस नेते हतबल झाले, अनेक वर्षे नेतृत्व करूनही आपले काही चालत नाही म्हटल्यावर त्यांनी ही जोडगोळी फोडण्याचे बरेच प्रयत्न केले. त्याला यशही आले. महाडिक-मंडलिक वेगळे झाले. आता त्यांच्या घराण्यातील दुसरी पिढी तब्बल २५ वर्षांनी एकत्र येऊन राजकारण करत आहे. कोल्हापूरची जनता त्यांना साथ देते की नाही हे निवडणूक निकाल समोर आल्यानंतर स्पष्ट होणार आहे.माजी आमदार महादेवराव महाडिक यांची कोल्हापूरच्या राजकारणाची सुरुवात १९९० च्या सुमारास कोल्हापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीतून झाली. जिल्ह्याच्या राजकारणाचे महापालिका हे प्रवेद्वार असल्याने महाडिक यांनी ताकद लावून महापालिकेत सत्ता प्रस्थापित केली. भिकशेठ पाटील यांच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला महापौर केल्याने त्यावेळी शहरवासीयांची महाडिक यांनी सहानुभूती मिळाली. तेथून पुढे महाडिक यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती, दूध संघ, केडीसीसी बँक ताब्यात घेतल्या.

महादेवराव महाडिक यांच्या राजकारणाला तत्कालिन आमदार स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांचे सहकार्य मिळाले. आपण दोघे एकत्र राहिलो तर जिल्ह्यात आपण नेते होऊ शकतो असा महाडिक-मंडलिक या दोघांना विश्वास होता त्यामुळे एकमेकास सहाय करत राजकीय पावले टाकली. मंडलिक महाडिक यांची मसल आणि मनी पॉवर एकत्र आल्याने पुढच्या काळात त्यांना शह देणारे कोणीच नव्हते. परंतु अनेक वर्षे जिल्ह्याचे नेतृत्व केलेले, पक्षीय विचारांशी बांधील राहून काम करणारे नेते, कार्यकर्ते या जोडगोळीमुळे राजकारणात हैराण झाले. त्यांनी दोघांना एकमेकांना दूर करण्याचा कॉग्रेस पक्षपातळीवर प्रयत्न झाले. महाडिक यांनी दस्तुरखुद्द शरद पवार यांच्याही काही राजकीय सूचना मान्य केल्या नाहीत. त्यामुळे सदाशिवराव मंडलिक यांना त्यांच्यापासून दूर करण्याचे प्रयत्न सहज सोपे झाले.त्यानंतरच्या काळात महाडिक-मंडलिक कधी सोयीने एकत्र आले तर कधी एकमेकांविरुद्ध लढले. २००४ च्या निवडणुकीत शिवसेनेकडून लढलेल्या स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे यांना महाडिक यांनी पाठिंबा दिला. एवढेच नाही तर रसदही पुरविली. २००९ च्या खासदारकीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने धनंजय महाडिक यांना तिकीट नाकारले म्हणून अपक्ष लढणाऱ्या सदाशिवराव मंडलिक यांना महाडिक यांनी छुपी मदत केली तर २०१४ मध्ये संजय मंडलिक यांच्या विरोधातच धनंजय महाडिक यांनी निवडणूक लढवून जिंकले होते तर २०१९ च्या निवडणुकीत संजय मंडलिक यांनी धनंजय महाडिक यांचा पराभव केला होता. आता मात्र मंडलिकांना निवडून आणण्याची जबाबदारी क्लस्टर प्रमुख म्हणून महाडिक यांनी उचलली आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkolhapur-pcकोल्हापूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४sanjay mandlikसंजय मंडलिकDhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिक