समीर देशपांडेकोल्हापूर : जिल्ह्यामध्ये पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अधिक धोकादायक असल्याचे सिद्ध झाले आहे. यावर्षीच्या केवळ साडेसहा महिन्यांत जिल्ह्यात १ लाख ३२ हजार ५५१ नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आले असून, केवळ दुसऱ्या लाटेत ३३९२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता तिसऱ्या लाटेच्या तोंडावर आरोग्य यंत्रणा आणखी भक्कम करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.मे आणि जून या दोन महिन्यांत कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक मोठ्या प्रमाणावर झाला. मे महिन्यात ५० हजारांहून अधिक कोरोना रुग्णसंख्या नोंदविण्यात आली आहे. प्रशासनाकडूनही नियम अंमलबजावणीमध्ये चाललेला धरसोडपणा आणि नागरिकांची बेफिकिरी या सगळ्यांचा परिणाम म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनास्थिती अजूनही नियंत्रणामध्ये आलेली नाही, ही वस्तुस्थिती आहे.पहिल्या आणि दुसऱ्या लाटेची तुलनात्मक स्थितीतपशील पहिली लाट दुसरी लाट
- नमुना तपासणी ३०३५७९ १०१२८६१
- पॉझिटिव्ह रुग्ण ४४,४३८ १.३२,५५१
- दैनंदिन अधिकतम रुग्णसंख्या -१७४७ २२०२
- कोविड केअर सेंटर्स - ६३ १९७
- समर्पित कोविड रुग्णालय - ४५ १०७
- मृत्यू १७०९ ३३९२
- दोन्ही लाटेतील पुरुष मृत्यू ३३७६
- दोन्ही लाटेतील महिला मृत्यू १७०५
दोन्ही लाटेतील बाधित रुग्णांची संक्षिप्त माहिती
- कोरोनाबाधित रुग्ण -१३.४४ टक्के
- बरे झालेले रुग्ण ९१.१६ टक्के
- सध्या क्रियाशील रुग्ण ७.२१ टक्के
- मृत्यू २.९६ टक्के
लसीकरण
- लसीकरण उद्दिष्ट ३१ लाख ९४ हजार ९९४
- पहिला डोस घेतलेले १० लाख १८ हजार ३०१
- पहिला डोस टक्केवारी ३२ टक्के
- दुसरा डोस घेतलेले ४ लाख ३८ हजार ५४२
- दुसरा डोस टक्केवारी १४ टक्के
कोरोनास्थिती नियंत्रणात न येण्याची कारणे१. मध्यंतरी झालेल्या काही निवडणुका२. प्रशासनाने व्यवहारबंदी करण्यास लावलेला उशीर३. स्थानिक पातळीवर न घेतलेली कडक भूमिका४. नागरिकांची बेफिकिरी