दिल्ली येथील कार्यक्रमात कॉमनवेल्थ व्होकेशनल विद्यापीठाचे संस्थापक सदस्य राकेश मित्तल, प्र-कुलगुरू रिपू राजन सिन्हा यांच्या हस्ते पीएच.डी पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी सीईडी फाउंडेशनचे अध्यक्ष प्रियदर्शी नायक, पॅलेस्टिनी दूतावासाचे मीडिया ॲडव्हायझर अब्दुल अल रझाक अबू झुबेर उपस्थित होते. शिक्षणाधिकारी लोहार यांनी रत्नागिरीचे शिक्षणाधिकारी, कोकण विभागीय बोर्डाचे सचिव म्हणून उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. जिल्ह्यातील मुख्याध्यापकांच्या एक हजार सहविचार सभांचे आयोजन करत कोरोनाकाळात शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावली.
फोटो (२००७२०२१-कोल-किरण लोहार (पीएचडी) : कोल्हापुरातील माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना कॉमनवेल्थ व्होकेशनल विद्यापीठाचे प्र-कुलगुरू रिपू राजन सिन्हा यांच्या हस्ते पीएच.डी पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी डावीकडून राकेश मित्तल, प्रियदर्शी नायक, अब्दुल अल रझाक अबू झुबेर उपस्थित होते.