केंद्रीय गुप्तवार्ता विभाग, राज्य गुप्तवार्ता विभाग, गोकुळ शिरगाव पोलीस, दहशतवाद विरोधी पथक, विमानतळ पोलीस व महाराष्ट्र सुरक्षा बल यांच्या संयुक्त सहभागाने गुरुवारी कोल्हापूर विमानतळावरील सुरक्षेचा आढावा घेण्यात आला. यावेळी कोल्हापूर विमानतळावरील टर्मिनल बिल्डिंग व इतर सर्व इमारती, धावपट्टी, सुरक्षा चौकी व विमानतळावर सभोवती असणाऱ्या सर्व कंपाउंडची पाहणी करण्यात आली. या आढावा दरम्यान सुरक्षेच्या दृष्टीने काही महत्त्वपूर्ण सूचना या पथकांकडून करण्यात आल्या आहे. काम सुरू असलेल्या ठिकाणी सुरक्षा चौकींवरील तत्परता वाढवणे, कंपाउंडच्या कडेने गस्त घालण्यासाठी चांगला रस्ता तयार करणे, अशा सूचना करण्यात आल्या. यावेळी केंद्रीय गुप्तवार्ता विभागाचे उपअधीक्षक श्री. कणकी, राज्य गुप्तवार्ता विभागाच्या नीलम पाटील, गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, दहशतवाद विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक मंगेश देसाई, कोल्हापूर विमानतळ प्राधिकरणाचे संचालक कमलकुमार कटारिया, विमानतळ पोलीस निरीक्षक तळेकर, आदी उपस्थित होते.
फोटो १० उजळाईवाडी विमानतळ
ओळ : उजळाईवाडी येथील विमानतळावर केंद्रीय गुप्तवार्ता विभाग, राज्य गुप्तवार्ता विभाग व गोकुळ शिरगाव पोलिसांकडून संयुक्त सुरक्षा आढावा घेताना केंद्रीय गुप्तवार्ता विभागाचे श्री. कणकी व इतर.
छाया:मोहन सातपुते