शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

अंबाबाई मंदिर परिसरात वाढीव सीसीटीव्हीसह सुरक्षा यंत्रणा, नवरात्रौत्सवानिमित्त जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 4:16 PM

शिखरांची रंगरंगोटी सुरू, रविवारपासून स्वच्छता..

कोल्हापूर : आगामी शारदीय नवरात्रौत्सवात अंबाबाई मंदिर व बाह्य परिसरात वाढीव २० सीसीटीव्ही कॅमेरे बसवा, परिसरातील धोकादायक इमारती उतरवून घ्या, आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष अद्ययावत यंत्रणेने सुसज्ज ठेवा, भाविकांसाठी पार्किंग व मोबाईल स्वच्छतागृहांची सोय करा अशा सूचना जिल्हाधिकारी अमाेल येडगे यांनी गुरुवारी संबंधित प्रशासनाला दिल्या.नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांतील देवता असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील सोयीसुविधांच्या आढावा बैठकीत ते बाेलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके, उपजिल्हाधिकारी डॉ. संपत खिलारी, करवीर प्रांताधिकारी हरीश धार्मिक, तहसीलदार स्वप्निल रावडे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांच्यासह संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते.यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी नवरात्रौत्सवाच्या तयारीशी संबंधित सर्व विभागांच्या तयारीचा आढावा घेतला. ते म्हणाले, मंदिर व परिसराचे स्ट्रक्चरल ऑडिट करुन घ्या, नवरात्रौत्सवात अखंडित वीजपुरवठा राहण्यासाठी महावितरणने काळजी घ्यावी, या काळात मंदिर परिसरात स्वच्छता राखा, त्यासाठी वाढीव मनुष्यबळ लागत असेल तर त्याची सोय करा. शहरात ठिकठिकाणी पार्किंगची व्यवस्था करा, मंदिर बाह्य आवारात वैद्यकीय उपचार केंद्रांची सोय करा. पार्किंगसह ठिकठिकाणी मोबाईल स्वच्छतागृहांची व्यवस्था करा.

गरुड मंडप दोन दिवसात उतरणार..नवरात्रौत्सवासाठी गरूड मंडप वेगाने उतरविले जात आहे. पुढील दोन दिवसात मंडप पूर्णत: उतरवले जाईल. परिसराची स्वच्छता झाली की त्यावर मांडव घालण्यात येणार आहे. या मांडवात नवरात्रौत्सव काळात अंबाबाईच्या उत्सवमूर्तीचे धार्मिक विधी केले जातील.

शिखरांची रंगरंगोटी सुरू, रविवारपासून स्वच्छता..सध्या अंबाबाई मंदिराच्या पाचही शिखरांची रंगरंगोटी सुरू आहे. तर रविवारपासून मंदिर परिसराची स्वच्छता सुरू करण्यात येणार आहे. यासह पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतर्फे अंतर्गत नियोजन सुरू आहे. नवरात्रौत्सवाच्या चार-पाच दिवस आधी पुन्हा जिल्हाधिकारी तयारीचा आढावा घेणार आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर