कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू आहे. जिल्हाबंदीमुळे उदगाव चेक पोस्ट सुरू करण्यात आला होता. तेथे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. प्रत्येक येणाऱ्या वाहनांची तपासणी करूनच जिल्ह्यामध्ये प्रवेश दिला जात होता. गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या घटल्यामुळे राज्य शासनाकडून अनलॉकची घोषणा करण्यात आली आहे. मात्र अजूनही कोल्हापूर, सांगली व सातारा हे जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. तरी जिल्हाबंदी उठल्यामुळे पुन्हा एकदा सांगली-कोल्हापूर महामार्गावरील वाहतूक सुरू झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
फोटो - ०७०६२०२१-जेएवाय-०४
फोटो ओळ -
उदगाव (ता. शिरोळ) येथील उदगाव टोल नाक्यावर जिल्हाबंदी उठविण्यात आल्यामुळे वाहनांची रेलचेल सुरू होती. (छाया - अजित चौगुले, उदगाव)