भादोले: तालुका हातकणंगले येथील कलाशिक्षक संतोष बबन कांबळे यांनी लहानात लहान खडू वरती विठ्ठल रुक्मिणीची कलाकृती साकारली आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने अवघ्या अर्धा ते एक इंच खडू वरती त्यांनी कला व श्रद्धा यांचा मिलाप करीत विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती साकारण्याचा प्रयत्न केला आहे.
फळ्यावर ती खडूचा वापर करता करता याच कडू पासून अनेक काहीतरी वेगळे करता येऊ शकतो या उद्देशाने संतोष कांबळे यांनी खडू वरती मूर्ती साकारण्याचा प्रयत्न केला असून, त्यांनी आजपर्यंत अनेक युगपुरुष, नेते, देव, देवता यांची अनेक शिल्पे बनविली आहेत.
यात खडूमध्ये अखंड साखळी, कोल्हापुरी चप्पल, पेन अशा विविध वस्तूंचही समावेश असून साबणांवरही त्यांनी वैविध्यपूर्ण कला घडविल्या आहेत. दसऱ्याला वाटल्या जाणाºया आपट्याच्या पानावरही विठु माझा लेकुरवाळा तर पिंपळाच्या पानावर विठू रायाची सुंदर आकर्षक अशी प्रतिमा कोरली आहे. यासाठी कांबळे यांनी लहानात लहान सुई व ब्लेडच्या वापर करीत या सर्व कलाकृती साकारल्या आहेत. विद्यार्थ्यांनाही ते वैविध्यपूर्ण कलेविषयी मार्गदर्शन करीत असून तेही आपले वेगळेपण जपत आहेत.संतोष कांबळे हे कलाविश्व महाविद्यालय सांगली, येथे कला शिक्षण पूर्ण केले आहे. गेल्या १८ वर्षा पासून त्यांनी ही वैविध्यपूर्ण कला जपली असून ती सर्व संग्रही ठेवली आहे. सध्या ते आदर्श गुरुकुल विद्यालय पेठ वडगांव येथे कलाध्यापक म्हणून सेवेत आहे.