कोल्हापूर : गणेशोत्सवामध्ये ध्वनिप्रदूषण नियमाचा भंग करणाºया तरुण मंडळांवर कडक कारवाई करून जागेवर डॉल्बी जप्त करा, अशा सक्त सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी मंगळवारी अधिकाºयांना दिल्या.
लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यामध्ये याबाबतची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांच्यासह लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तालीम, तरुण मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यानंतर मोहिते यांनी शहरातील जुना राजवाडा, शाहूपुरी, करवीर व राजारामपुरी पोलीस ठाण्यांना भेटी देऊन पोलीस निरीक्षकांना डॉल्बीबाबत सूचना केल्या.
कोल्हापूर जिल्'ात डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा पोलीस प्रशासनाचा निर्धार आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक मोहिते यांनी पोलीस ठाण्यांना भेटी दिल्या.यावेळी संजय मोहिते म्हणाले, कायदा-सुव्यवस्थेबरोबरच सर्वत्र शांतता राहावी यासाठी नियोजन करावे. रेकॉर्डवरील (अभिलेख) सराईत गुन्हेगारांना हद्दपार करा, डॉल्बीचे दुष्परिणाम आरोग्यावर होतात. त्यामुळे तरुण मंडळांनी विशेषत: पारंपरिक वाद्यांवर भर द्यावा, सामाजिक व विधायक उपक्रम राबवून गणेशोत्सवाच्या वर्गणीमधून गरजूंना मदत करावी.
त्याचबरोबर गणेशोत्सवामध्ये महिलांचा सहभाग वाढवावा. निवडणुका असो किंवा राजकीय व्यक्तींचा दहीहंडीचा कार्यक्रम असो, डॉल्बी लावण्यास सक्त मनाई केली आहे. कायदा व सुव्यवस्थेला बाधा येणार नाही, यासाठी गणेशोत्सवाचे काटेकोरपणे नियोजन करा. मंडळांच्या वैयक्तिक बैठकीवर भर द्या व घरगुती गणेश विसर्जनावेळी चौका-चौकांत पाण्याची कुंडे करा आदींबाबत मोहिते यांनी सूचना केल्या.यावेळी लहान गणेश तरुण मंडळांना गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी पर्यायी मार्ग द्यावा, अशी सूचना यावेळी कार्यकर्त्यांनी मोहिते यांच्यासमोर केल्या. यावेळी पोलीस निरीक्षक निशिकांत भुजबळ, संजय साळुंखे, संजय मोरे यांच्यासह गुन्हे शोधपथकातील (डी.बी) अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.