यड्राव : येथील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पॉलिटेक्निकमधील १६ विद्यार्थ्यांची नेक्स्टीअर ऑटोमोटिव्ह या आंतरराष्ट्रीय कंपनीत निवड झाली आहे. मेकॅनिकल विभागातील या सर्व विद्यार्थ्यांना पुणे येथील चाकण प्लांटमध्ये नोकरीची संधी मिळाली आहे.
महाविद्यालयातील अक्षय मदने, सोमेश पाटील, प्रणव पाटील, सिद्धांत पाटील, हर्षद बारवाडे, वैभव पटेल, नझीम पठाण, ओम शिंदे, अरबाज दाडीवाले, वशिष्ट शुक्ला, तेजस जाधव, रोहित कळकुटे, श्रीराज किणे, ऋषभ पाटील, तात्यासाहेब मगदूम, अजय साने या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
नेक्स्टीअर ऑटोमोटिव्ह ही कंपनी जगभरातील ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील अग्रेसर कंपनी आहे. कंपनी ऑटोमोटिव्ह स्टिअरिंग सिस्टीम, हायड्रोलिक स्टिअरिंग, सिस्टीम ड्राइव्ह लाइन, इलेक्ट्रॉनिक स्टिअरिंग कॉलमसह विविध स्टिअरिंग कॉलम्स बनविते. कंपनीचे जगभरात ५२ ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग प्लांट व टेक्निकल व सॉफ्टवेअर सेंटर आहेत. १३ हजारांपेक्षा अधिक कर्मचारी आहेत. बी.एम.डब्ल्यू., फोर्ड, टोयोटा, मारुती सुझुकी, जनरल मोटर्स, फोक्स वॅगन कंपन्यांना स्टिअरिंग मटेरिअल्स पुरविते.
महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांसाठी स्पेशल ॲप्टिट्यूड ट्रेनिंग, टेक्निकल स्किलचे वेगळे प्रशिक्षण तसेच मॉक इंटरव्ह्यू यांसह टेक्निकल सेशन, व्हॅल्यू ॲडेड प्रोग्रॅम, कंपनी स्पेसिपिक ट्रेनिंग, अद्ययावत तंत्रज्ञानाबाबत कंपनीतील व इंडस्ट्री क्षेत्रातील तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन यांसह विविध उपक्रम राबविले जातात. त्याचा उपयोग विद्यार्थ्यांना या कॅम्पससाठी झाल्याची माहिती ट्रेनिंग ॲण्ड प्लेसमेंट विभागाने दिली.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर व एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी अभिनंदन केले. प्राचार्य बी. एस. ताशीलदार, ट्रेनिंग प्लेसमेंट विभागाचे प्रा. अभिजित केकरे, प्रा. नेहा सोनी यांच्यासह सर्व डीन, विभाग प्रमुख यांचे सहकार्य लाभले.