महाविद्यालयाच्या प्रतीक्षा खोत, ऐश्वर्या पाटील आणि रणजित मोहिते-पाटील या तीन विद्यार्थ्यांची फिलिप्स इंडिया या कंपनीमध्ये डिप्लोमा ट्रेनी इंजिनिअर म्हणून निवड झाली आहे. तर साक्षी बुवा, अपेक्षा पाटील, प्राजक्ता शिंदे व रामदास ढोक यांची बजाज ऑटो या कंपनीत निवड झाली आहे. मेकॅनिकल विभागाच्या प्रवीण पाटील, सिद्धांत पाटील या दोघांची बजाज ऑटो कंपनीत निवड झाली असून, सूरज गोंडे, सुशांत भोसले आणि प्रतीक दडगे या विद्यार्थ्यांची पुणे येथील टाटा मोटर्स कंपनीने डिप्लोमा ट्रेनी इंजिनिअर म्हणून निवड केली आहे. तसेच पंकज दडगे, नीलेश मगदूम, सुशांत भोसले, संजय मगदूम, आदित्य काळे-पाटील या विद्यार्थ्यांची पुणे येथील वेव्ह सस्पेन्शन या कंपनीत निवड करण्यात आली आहे. तुषार जमदाडे, सुमित पाटील आणि प्रवीण पाटील यांची कमिन्स इंडियामध्ये डिप्लोमा ट्रेनी इंजिनिअर म्हणून निवड झाली आहे.
यशस्वी सर्व विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. ए. खोत, सर्व विभागाचे विभागप्रमुख, सर्व शिक्षक, कॉलेजचे टीपीओ अक्षय खामकर यांचे मार्गदर्शन लाभले. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील आणि संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता यांनी अभिनंदन केले.