लोकमत न्यूज नेटवर्क
कसबा बावडा: डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड टुरिझमच्या २४ विद्यार्थ्यांची विविध पंचतारांकित हॉटेल्स आणि रिटेल क्षेत्रातील नामांकित कंपन्यांमध्ये निवड झाली. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड टुरिझमतर्फे विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त प्रात्यक्षिक ज्ञान मिळावे यावर नेहमीच भर दिला जातो. विद्यार्थ्यांना सयाजी, मॅरियोट हॉटेल्स, द फर्न ग्रुप ऑफ हॉटेल्स, वेस्ट इन अशा जगप्रसिद्ध पंचतारांकित हॉटेल्सच्या किचन, रेस्टॉरंट व अन्य विभागामध्ये करिअर घडवण्याची संधी डी. वाय. पाटील ग्रुपतर्फे देण्यात आली. या महाविद्यालयाच्या ९ विद्यार्थ्यांची रिलायन्स कंपनीत, बेळगाव येथे ९, कोल्हापूर येथे ४, गोवा व पुणे येथे प्रत्येकी एका विद्यार्थ्याची तेथील पंचतारांकित हॉटेल्समध्ये निवड झाली आहे. हॉस्पिटलिटी व टुरिझम ही दोन्ही क्षेत्रे प्रचंड वेगाने विस्तारत असून या क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची मागणी वाढतच जाणार आहे. डीवायपीमध्ये बी. एस्सी इन हॉस्पिटॅलिटी स्टडिज या तीन वर्षे डिग्री प्रोग्रामसाठी प्रवेशप्रक्रिया सुरू असल्याचे प्राचार्य रुधिर बारदेस्कर यांनी सांगितले.