कंपनीचे यावर्षी तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालय येथे कॅम्पस ड्राईव्ह आयोजन करण्यात आले होते. कंपनीतर्फे प्लेसमेंटसाठी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे गटचर्चेद्वारे मानांकन करून पात्र विद्यार्थ्यांना कंपनीतर्फे होणाऱ्या इंटरव्ह्यूमध्ये सहभागी करून घेतले गेले. केईपी इंजिनिअरिंग सर्विसेस पुणे, डेक्कन फाईन केमिकल्स हैदराबाद, ट्रँग्युलर इन्फो सोलूशन्स, स्मार्ट सर्व्ह पुणे, कल्याणी इन्फ्रास्ट्रक्चर पुणे ,युनिकेम इंडस्ट्रीज लि. आदी कंपन्यांत निवडी झाल्या.
सर्व विद्यार्थ्यांचा वारणा समूहाचे अध्यक्ष डॉ. विनय कोरे, प्रशासकीय अधिकारी डॉ. वासंती रासम यांनी सत्कार केला. प्राचार्य डॉ. एस. व्ही. आणेकर, ट्रेनिंग आणि प्लेसमेंट सेलचे प्रमुख प्रा. पी. जे. पाटील, सहयोगी ट्रेनिंग आणि प्लेसमेंट प्रमुख प्रा. आर. सी. शिक्केरी यांनी विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंटसाठी अथक् परिश्रम घेतले, तर प्रा. एल. बी. पटकुरे, प्रा. एस. टी. पाटील, सी. पी. शिंदे, डॉ. पी. व्ही. मुळीक, प्रा. ए. जी. पाटील आदींचे मार्गदर्शन लाभले.
फोटो ओळी:
तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या बहुराष्ट्रीय कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांबरोबर ट्रेनिंग आणि प्लेसमेंट सेलचे प्रमुख प्रा. पी. जे. पाटील, सहयोगी ट्रेनिंग आणि प्लेसमेंट प्रमुख प्रा. आर. सी. शिक्केरी, प्रा. एस. एच. मोरे आदी उपस्थित होते.