शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्याकडे महाराष्ट्राचे सत्यात उतरणारे स्वप्न, माझा कम्फर्ट भाजपसोबत; राज ठाकरेंनी मांडली रोखठोक भूमिका
2
मराठा समाजाची कांड्यांवर मोजण्याइतकी आहेत मतं; भाजपच्या बबनराव लोणीकरांचे वादग्रस्त वक्तव्य
3
शिवाजी पार्कवर उद्धवसेना, मनसेची सभा होणार?; नगरविकास खात्याच्या निर्णयाकडे लक्ष
4
जगातले दुश्मन एकत्र येतात तर आम्ही एकत्र येण्यावर चर्चा तर हवी; 'लोकमत'च्या मुलाखतीत राज ठाकरेंचं वक्तव्य
5
भाजपच्या बंडखोर उमेदवाराचा शिंदेसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा
6
उठा उठा थंडी आली, स्वेटर घालायची वेळ झाली; मुंबई २० अंशांवर, राज्यात थंडीचा कडाका होतोय सुरू!
7
२० वर्षांत मतदार नेमके कुणाकडे गेले? २००४ ते २०१९ मध्ये काय घडलं?; जाणून घ्या आकडेवारी
8
२ हजारांहून अधिक मतदार सध्या कामानिमित्त परदेशात
9
दिव्यांग, ज्येष्ठांना मतदानाला आणण्यासाठी विशेष सोय; सक्षम ॲपवर नाव नोंदवण्याचे आवाहन
10
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

Kolhapur: सेल्फ अन् ग्रुप स्टडी करत लाटवडेच्या अक्षयची पीएसआय परीक्षेत बाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2024 12:16 PM

खोची : शेतीत नावीन्यपूर्ण प्रयोग करून पिकांचे भरघोस उत्पादन काढण्यात अग्रेसर असणाऱ्या लाटवडे (ता. हातकणंगले) येथील शेतकरी कुटुंबातील अक्षय ...

खोची : शेतीत नावीन्यपूर्ण प्रयोग करून पिकांचे भरघोस उत्पादन काढण्यात अग्रेसर असणाऱ्या लाटवडे (ता. हातकणंगले) येथील शेतकरी कुटुंबातील अक्षय माणिक पाटील याने पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली.शालेय जीवनापासूनच गुणवत्तेत सतत आघाडीवर असणारा अक्षय निश्चितपणे उज्ज्वल यश मिळविणार, अशी त्याच्या आईवडिलांची खात्री होती. गुरुवारी परीक्षेचा निकाल लागला. त्यामध्ये यशस्वी झाल्याची बातमी समजताच आई वडिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला. प्रचंड परिश्रमातून जिद्दीने त्याने यश मिळविल्याचे वडील माणिक पाटील यांनी सांगितले.अक्षय याचे माध्यमिक शिक्षण गावातीलच जयवंत हायस्कूलमध्ये झाले.९५ टक्के गुण मिळवून तो वडगांव केंद्रात दहावीत अव्वल ठरला होता. विवेकानंद कॉलेजमधून बारावीत ९१ टक्के गुण मिळवून त्याने राहुरी येथे बी.टेक ॲग्रिकल्चरचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर कोरोनाच्या कालखंडात राज्यसेवा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. तीन प्रयत्नांत अपयश आले. विद्यापीठात स्पर्धा परीक्षेचे वातावरण असल्याने अभ्यासात अधिक गोडी निर्माण झाली.सेल्फ स्टडी बरोबरच ग्रुप स्टडी करताना मार्गदर्शनाची उणीव जाणवली नाही. सीनियर विद्यार्थी यांनी सतत योग्य मार्गदर्शन केले. अभ्यासिकेत बसून वाचन, नोट्स काढत प्रश्नपत्रिका सोडविल्या. परीक्षेची भीती कधी मनात आणून दिली नाही. आत्मविश्वास खंबीर बनत गेला. पोलिस उपनिरीक्षकपदाची परीक्षा दिल्यानंतर यात यश मिळणारच या विचारावर ठाम राहिलो, यश मिळाले असे त्याने सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMPSC examएमपीएससी परीक्षा