शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
5
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
6
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
7
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
8
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
9
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
10
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
11
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
13
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
14
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
15
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
16
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
17
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
18
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

महाराष्ट्र केसरी स्पर्धा: पृथ्वीराज, संग्राम पाटील यांची गादी गटातून निवड, चाचणीस ३०० हून अधिक मल्ल सहभागी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2022 5:51 PM

माती गटातून निवड झालेल्या मल्लांची नावे जाणून घ्या

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने अहमदनगर येथे होणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्हा व शहर तालीम संघाकडून विद्यमान महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील (देवठाणे), संग्राम पाटील (मूळ आमशी) यांची गादी गटातून, तर अरुण बोंगार्डे (बानगे) शुभम सिद्धनाळे (दत्तवाड) यांची माती गटातून निवड झाली.मोतीबाग तालीम येथे रविवारी महाराष्ट्र केसरी व वजनी गटातील निवड चाचणीस सुरुवात झाली. जिल्ह्यातून या निवड चाचणीस ३०० हून अधिक मल्ल सहभागी झाले होते. गादी गटातून महाराष्ट्र केसरी निवड चाचणीसाठी पृथ्वीराज पाटीलची लढत कौतुक डाफळे याच्याशी झाली. या लढतीत जखमी झालेल्या डाफळेने पुढे चाल दिली. दुसऱ्या लढतीत संग्राम पाटील याने वाकरेच्या तेजस मोरेचा पराभव केला. माती गटातून शुभम सिद्धनाळे याने शित्तूरच्या कुमार पाटील याच्यावर मात केली. दुसऱ्या लढतीत अरुण बोंगार्डे याने मिणचेच्या श्रीमंत भोसले याच्यावर मात केली.यावेळी खासदार मंडलिक यांनी मंडलिक ट्रस्टच्या वतीने मोतीबाग तालमीच्या नूतनीकरणासाठी ३० लाखांचा धनादेश कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील यांच्याकडे सुपुर्द केला. यावेळी महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर, संघाचे पदाधिकारी ॲड. महादेवराव आडगुळे, हिंदकेसरी दीनानाथसिंह, आर. के. पोवार, मारुतराव कातवरे आदी उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWrestlingकुस्तीMaharashtra Kesariमहाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा