शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
6
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
7
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
8
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
9
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
13
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
14
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
15
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
16
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
17
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
18
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
19
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

कुरूंदवाड नगरपालिकेत आत्मदहनाचा प्रयत्न-: रखडलेल्या नळ पाणीप्रश्नी शिवसेनेचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2019 12:55 AM

शहराची रखडलेली सुधारित नळ पाणीपुरवठा योजना निधी असूनही श्रेयवादातून मार्गी लावण्यात अपयशी ठरल्याने नगराध्यक्षांसह सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांनी राजीनामा देऊन पालिका बरखास्त करावी, अशी मागणी करत मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात शिवसेना शहरप्रमुख राजू आवळे यांनी

ठळक मुद्देमुख्याधिकाऱ्यांच्या दालनातील प्रकार

कुरुंदवाड : शहराची रखडलेली सुधारित नळ पाणीपुरवठा योजना निधी असूनही श्रेयवादातून मार्गी लावण्यात अपयशी ठरल्याने नगराध्यक्षांसह सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांनी राजीनामा देऊन पालिका बरखास्त करावी, अशी मागणी करत मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात शिवसेना शहरप्रमुख राजू आवळे यांनी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केल. अचानक झालेल्या या प्रकाराने गोंधळ उडाला. नागरिक व पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला.

दरम्यान, शिवसेनेच्या आक्रमकपणामुळे नगराध्यक्ष जयराम पाटील यांनी या योजनेबाबत मंगळवारी (दि. ५) पालिकेच्या विशेष सभेत ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर आवळे शांत झाले. मात्र, निर्णय न झाल्यास बुधवारी (दि. ६) नगराध्यक्ष पाटील यांच्या घरासमोर शिवसेनेच्यावतीने ‘बोंब मारो आंदोलन’ करून तिथेच आत्मदहन करण्याचा इशारा आवळे यांनी दिला. त्यामुळे या योजनेबाबत ठोस निर्णय घेण्यासाठी नगराध्यक्ष पाटील यांची धावपळ उडाली. शहराची सुधारित नळ पाणीपुरवठा योजना गेल्या तीन वर्षांपासून रखडली आहे. त्यामुळे शहरवासीयांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनल्याने शिवसेनेच्यावतीने शहरप्रमुख आवळे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या काही महिन्यांपासून आंदोलन करीत योजना मार्गी लावण्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधींवर दबाव आणत आहेत.

सत्ताधारी-विरोधकांत श्रेयवादावरून खेळ सुरू असल्याने गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास आवळे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने पालिकेवर मोर्चा काढला. नगराध्यक्ष पाटील हे मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांच्या कक्षात होते. आवळे यांनी योजनेबाबत कोणता निर्णय घेतला. या योजनेसाठी मोठा निधी असूनही योजना पूर्ण करता येत नसेल तर सत्ताधारी व विरोधकांनी पदाचा राजीनामा देऊन पालिका बरखास्त करण्याची मागणी करत अचानक आवळे यांनी सोबत आणलेला रॉकेलचा डबा अंगावर ओतून घेतला. या प्रकाराने मुख्याधिकारी कक्षात एकच गोंधळ उडाला. पोलीस व नागरिकांनी आवळे यांना आत्मदहनापासून वाचविले.ठोस निर्णय घेण्यासाठी मंगळवारी बैठकशिवसेनेच्या आक्रमक आंदोलनामुळे नगराध्यक्ष पाटील यांनी या योजनेवर ठोस निर्णय घेण्यासाठी मंगळवारी पालिकेची विशेष सभा बोलावली असून, योजना पूर्ण करण्यासाठी ठोस निर्णय घेण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आवळे शांत झाले. आंदोलनात आप्पा भोसले, सुहास पासोबा, रणजित आवळे, राजू बेले, संतोष नरके, अमित आवळे, अफजल महात, दिग्विजय चव्हाण, आदी सहभागी झाले होते.कुरुंदवाड येथे गुरुवारी शिवसेनेच्यावतीने पालिकेवर मोर्चा काढण्यात आल्यानंतर आंदोलकांना लेखी आश्वासन देताना नगराध्यक्ष जयराम पाटील, मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर, दीपक गायकवाड यांच्यासह पालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.