शहरं
Join us  
Trending Stories
1
बेडी काढताच अक्षयने खेचले पोलिस अधिकाऱ्याचे पिस्तूल; पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या
2
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य; आर्थिक लाभ संभवतात, मान-सन्मान होतील
3
कोणी अंगावर आला, तर त्याला आता शिंगावर घेणारच; आरक्षण म्हणजे 'गरिबी हटाव' नव्हे
4
लैंगिक अत्याचाराचे प्रकरण होणार बंद; मृत्यूमुळे अबेटेड समरी दाखल करणार
5
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
6
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
7
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
8
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
9
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
10
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
11
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
12
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
13
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
14
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
15
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
16
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
17
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
18
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
19
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
20
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी

केलेल्या कामाचे बील देण्यास टाळाटाळ, ठेकेदाराचा आत्मदहनाचा प्रयत्न; कोल्हापूर महापालिकेत घडला प्रकार

By भारत चव्हाण | Published: November 30, 2023 7:31 PM

कोल्हापूर : कोरोना काळात बागल चौक येथील कब्रस्तानमध्ये केलेल्या कामाचे वीस लाखाचे बील देण्यास महापालिका प्रशासनाने टाळाटाळ केल्यामुळे अरुण ...

कोल्हापूर : कोरोना काळात बागल चौक येथील कब्रस्तानमध्ये केलेल्या कामाचे वीस लाखाचे बील देण्यास महापालिका प्रशासनाने टाळाटाळ केल्यामुळे अरुण नारायण जगधने या ठेकेदाराने अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. ही घटना गुरुवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास महापालिका चौकात घडल्याने खळबळ उडाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी या व्यक्तीस आत्मदहन करण्यापासून रोखले आणि अतिरीक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांच्या समोर उभे केले. त्यानंतर बील अदा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.राजेंद्रनगर न्यू वसाहत येथे राहणाऱ्या अरुण जगधने यांना महापालिकेचे तत्कालिन आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, तत्कालिन शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत,  उपशहर अभियंता बाबुराव दबडे या तिघांनी बागल चौक येथील कब्रस्तानमध्ये एक काम दिले होते. कोरोना काळात मुस्लिम व्यक्तींचे मृतदेह दफन करण्याकरिता दोन एकर जागेत मुरुमाचा भराव टाकून तसेच तेथे असलेली एक छोटी खण मुजविण्यासह कब्रस्तानमध्ये मुरुमाचे रस्ते तयार करण्याचे हे काम होते.सगळीकडे लॉकडाऊन असताना जगधने यांनी दहा कर्मचाऱ्यांना बरोबर घेऊन रात्रंदिवस हे काम पूर्ण केले. कामाचे बील देण्याची जेंव्हा विनंती करायला लागले तेंव्हा जगधने यांना टाळण्यात येऊ लागले. नंतर झालेल्या कामाची निविदा प्रसिध्द झाली. त्यावेळी जगदणे यांनी हे काम मी केले आहे, असे सांगितले, तेंव्हा त्यांनाही  निविदा भरण्यास सांगण्यात आले.परंतू जगधने हे महापालिकेचे अधिकृत ठेकेदार नसल्याने निविदा भरता आली नाही.  दरम्यानच्या काळात आयुक्त कलशेट्टी, सरनोबत यांची बदली झाली तर दबडे निवृत्त झाले. त्यामुळे त्यांचे बील देण्यास टाळाटाळ होऊ लागली. गेली अडीच वर्षे ते बीलासाठी पाठपुरावा करत असताना अलिकडेच जगदणे यांना या कामाचे बील अन्य चार ठेकेदारांनी परस्पर उचलले असल्याचे निदर्शनास आले.

काही अधिकाऱ्यांनी त्यांना यातून मार्ग काढूया, ज्यांनी बील उचलले आहे, त्यांना पैसे देण्यास सांगूया असे सांगण्यात येत होते. काम केलेल्या कर्मचाऱ्यांना मात्र जगधणे यांनी बायकोचे दागिणे गहाण ठेऊन तसेच एक जेसीबी विकून पैसे भागविले. काम केले पण बील मिळाले नाही, आपलेच नुकसान झाले यामुळे खचलेल्या जगधने यांनी गुरुवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास कॅनमधून आणलेले रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी