निवेदनात म्हटले आहे, मनपाडळे ग्रामपंचायतीने सन २०१८ मध्ये मारुती व पांडुरंग अण्णाप्पा वाघमारे यांची मिळकत एका ठरावाद्वारे जगन्नाथ जिनांपा वाघमारे यांच्या नावे केली. त्या बरोबरच बाबासो व धनाजी जिनाप्पा वाघमारे यांची कोणतीही कागदपत्रे न पाहता सरपंच उपसरपंच व ग्रामसेवक यांनी मिळकतीवर चुकीच्या नोंदी केल्या आहेत.
मिळकतीवरील चुकीच्या नोंदी रद्द करण्यासंदर्भात आनंदा वाघमारे यांनी वारंवार तक्रार अर्ज केले आहेत. मात्र त्याची दखल कोणी घेतली नाही. मनपाडळे ग्रामपंचायतीने मिळकतीवर केलेल्या चुकीच्या नोंदी रद्द करून नोंदणी करणाऱ्या संबंधित सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक यांच्यावर कारवाई करावी अन्यथा गुरुवारी जिल्हा परिषदेसमोर कुटुंबासह आत्मदहन करणार असल्याचे आनंदा वाघमारे यांनी निवेदनात म्हटले आहे.
याबाबत मनपाडळेचे सरपंच रायबाराजे शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, तक्रारदार यांच्या मागणीप्रमाणे ग्रामपंचायतीत ठराव करून तक्रारदार यांना न्याय दिला आहे. ग्रामपंचायती ठरावाची प्रत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर केली आहे.